मध्ये कधीतरी बरं वाटत नाही म्हणून घरीच थांबले होते. दुपारी थोडा बरं वाटायला लागलं आणि मग ४-४.३० वाजता बाल्कनी मधल्या झाडांना पाणी घातलं. पाणी घातलं आणि मंन बघता बघता भूतकाळात शिरलं .
आमच जुनं घर आठवलं, दोन्ही बाजूला दोन दोन खोल्या आणि मध्ये अंगण. खूप आधी , म्हणजे मी साधारण ४-५ वीत असेपर्यंत आमच्या अंगणात पारिजात होता. पेरूची दोन झाडं होती आणि मग भिंतीना लागून झाडांच्या कुंड्या होत्या. काही शोभेची झाडं तर काही फुलांची आणि जमिनीत लावलेल्या पिवळ्या फुलांचा वेल होता. चारही खोल्यांची दार अंगणात उघडायची. आणि मग एक मुख्य दरवाजा होता, जो बोळात उघडायचा. घर बंदिस्त होता आमचं. एका बाजूला बोळात उघडणारा दरवाजा तर दुसर्या बाजूला भिंत. घराचा आकार चौकोनी होता.
एका पावसाळी रात्री एकदम कड्कड असा आवाज झाला , कुठेतरी काहीतरी पडलं असावं, असा विचार करून आम्ही गप्प बसलो. आणि सकाळी उठून बघतो तो काय, पारिजातक पडला होता . त्याच्या पुढे कपडे वळत घालायचा एक लोखंडी बार होता म्हणून फक्त तो पुर्ण उन्मळून पडला नाही. त्याच्या आधारावर तो तसाच रहिला. पुढे बरीच वर्ष तो तसाच होता. त्याच्या खोबणीत दरवर्षी सुरवांटांचा डेरा पडायचा , मोठे मोठे बोटा एवढे जाड सुरवंट, बघून भीती पण वाटायची आणि किळस पण यायची.
झाडांवरचे पेरू एकदम मोठे आणि चवीला गोड असायचे. आम्ही त्याला 'खोबरी' पेरू म्हणायचो. हळू हळू त्या झाडांवर भरपूर माकड यायला लागली. आणी कौल फुटायचा त्रास सुरु झाला. शेवटी , बाबांनी पेरूची झाडं तोडायची ठरवली आणि मग पडता पडता वाचलेला पारिजात पण निघून गेला . पण या सगळ्यांत माझ्या वेली मात्र वाचल्या. सोपा आणि त्याच्या समोरच्या खोलीच्या छपरावर पसरल्या. त्यामुळे अंगणात १२ महिने सावली राहायला लागली.
या सगळ्या झाडांना पाणी घालण हे काम माझ्याकडे असायचं. रोज संध्याकाळी ४वाजता पाणी यायचं . नळाला पाण्याची पाईप लावून पाणी घालायचे मी. माझ्यासाठी हे पाणी घाळण एखाद्या सोहोळ्यापेक्षा कमी नसायचं. वेलींवर भरपूर पाणी उडवून , त्याखाली जाउन उभी रहायाचे मी. त्या वेळी वेलींवरून पडणारे थेंब तोंडावर झेलायला मज्जा यायची. मस्त वाटत रहायच. ओलं अंगण , वरून ठिबकणार पाणी आणि संध्याकाळच प्रसन्न वातवरण , अहाहा, त्याची बातच काही और होती.
आज परत एकदा सगळ फिरून आले, वेलींखाली जाऊन उभी राहिले,पाण्याचे थेंब झेलले आणि फ्रेश झाले.