Friday, 20 July 2012

आज श्रावाणातला पहिला शुक्रवार.....आठवण करून देणारा लहानपणची . माहिती नाही पण सकाळपासूनच सगळ आठवायला लागल. कोल्हापुरातले ते दिवस कधीही परत न येणारे...
साधारण सात  - आठ वर्षाची असताना आम्ही ज्यांच्याकडे भाड्याने राहायचो त्यांच्याकडे सकाळी प्रसादाच निमंत्रण असायचं. कुमारिका म्हणून मी  सवाष्ण म्हणून आई. मी आणि आई साधारण सकाळी 9.30-9.45 वाजता त्यांच्याकडे  जेवायला जायचो . पावसामुळे हवेत गारवा असायचा....
त्यांच्या माजघरात आमची पान मांडलेली असायची...बाजूलाच देवघर होत त्याचंसुरेख . सुरेख पूजा केलेली असायची अंबाबाई ची . सवाष्ण जेवन्णार असल्यामुळे जेवण साग्रसंगीत असायचं. माझ्यासाठी रु1 दक्षिणा असायची आणि त्यावेळी  रु1 सुद्धा खूप जास्त होता.
अजूनही त्यांच्या माजघरातला वास आठवतो मला...गरम गरम जेवणाचा ...वरण-भाताचा-पुरणपोळ्यांचा , देवासमोर लावलील्या उदबत्तीचा, देवीला घातलेल्या हारांचा...
सगळ आठवलं आणि आजची सकाळ एकदम प्रसन्न होऊन गेली...

Thursday, 10 May 2012

Home made Garlic Brade...ummmm...tasty

एक सोप्पा  आणि पटकन बनणारा tasty प्रकार .......
घरी जर लोणी असेल तर ते चालेल नाहीतर बाहेर विकत मिळणारे Butter पण चालेल. लोण्यामध्ये चवीपुरते तिखट, मीठ आणि लसूण paste  घालावी. मिश्रण चांगले mix करून घ्यावे आणि ते bread च्या slice ला दोंही बाजूला लावावे. आणि  slice गरम तव्यावर चांगला भाजावा. तुमचा home made Garlic Bread तय्यार ....:D..

Tuesday, 20 December 2011

एक फसलेली नेशनल पार्क पिकनिक

नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी ठरलं कि आपण उद्या संजय गांधी नेशनल पार्क ला जावूया. मी , शर्वरी (माझी मुलगी) , स्मिता, सास्वती, साई सगळ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता ठाणे स्टेशन ला भेटायचं ठरवलं. मंदारन नेहेमीप्रमाण घोळ केला येण्याचा पण शेवटी त्यान पण पक्कं केल.

सकाळी उठ्ल्यावरच पाल चुकचुकायला लागली. शर्वरीन येणार-नाही येणार चा गोंधळ केला आणि फिनाल्ल्य आम्ही दोघी  ठाणे स्टेशनवर ९.३० वाजता पोहोचले...त्यामध्येच साई चा फोने आला आत्ता उठलोय आणि थोडा उशीर होईल...झाल . त्याला म्हटलं पटपट अवर आणि ये, आम्ही थांबतो. 

मी आणि शर्वरी स्टेशनवर पोहोचेपर्यंत स्मिता येऊन पोहोचली होती...अजून मंदार, सास्वती आणि साई चा पत्ता नव्हता...मग काय कराव म्हणून आम्ही नाष्टा उरकून घेतला...एकदा वाटल सगळ्यांना सांगाव कि पिकनिक कॅन्सिल केली आहे आणि मस्तपैकी घरी जाऊन झोपावं...पण नाही हौस न National park बघायची...:P
शेवटी सगळे १०.१५ पर्यन्त ठाणे स्टेशन च्या जवळच्या ST stand जमलो. ST पण लगेच आली  . "direct
 बोरीवली direct बोरीवली...पोवई मार्गे..ticket जास्त आहे" असा conductor ओरडत असतानाच आम्ही आत शिरलो. कुणीही तसदी घेतली नाही conductor ला विचार्याची कि अरे घोडबंदर रोड सोडून तू पोवई मार्गे का ST काढणार आहेस??....(दुसरा फटका)

Wednesday, 21 September 2011

खूप सारे विचार गोंधळ करताहेत...आजची news  एकदम गोंधळून टाकणारी होती. विचार करायला लावणारी होती...IIT -Bangalore च्या एका student ने आत्महत्या केली, कारण काय तर तिच्या boyfriend ने तिला facebook वर dump केल, त्याचा बदला घेण्यासाठी तिने हे केल....खरच कुणी इतका टोकाचा विचार करू शकत? असा असेल तर या पिढीला प्रेमाचा खरा अर्थ तरी कळला आहे का?? आपण कुणाचेतरी देण लागतो याचा विचार हे लोक करणारच नाहीत का? आपल्याला हे आयुष्य कुणामुळ तरी मिळाल आहे आणि त्यावर आपला पूर्ण हक्क नाही हे कधी कळणार यांना? असल्या कृतीने आपण आपल्या आई वडिलांना किती यातना देतो हे कळणारच नाही का यांना? आयुष्य म्हणजे काय फक्त boyfriend  असतो का? बाकी चे कुणीच महत्वाचे नसतात?

Sunday, 18 September 2011

प्रत्येक गोष्ट perfect असावी असा अट्टाहास कशासाठी? आपण काय कराव आणि काय नाही , परत कशापद्धतीने कराव हे आपणच का नाही ठरवत? का असा विचार करतो, अरे आपण करतोय ते बरोबर आहे का नाही ? अरे समोरचा काय म्हणेल? आपण का हे विसरतोय आयुष्य एकदाच मिळणार आहे आणि ते आपल्यापद्धतीने जगण्याचा आपल्याला अधिकार आहे....का विसरत चाललो आहे आपण हे कि आयुष्य सुंदर आहे आणि त्याचा महोत्सव करायचा आहे आपल्याला.....
आता राहिला प्रत्येक गोष्ट perfect असण्याचा अट्टाहास...कशासाठी? हा अट्टाहास सगळ्या नाशाला कारणीभूत होत नसेल ना? असा अट्टाहास बरोबर tension घेऊन येतो. का आपण आपल्या आनंदासाठी काही करत नाही? कोणत्याही यशस्वी कलावंताला विचारा तो पण हेच सांगेल त्याला आनंद देणारी कलाकृती त्याची उत्कृष्ट कलाकृती असेल माग ती बाकीच्यांना आवडो व ना आवडो....
थोडक्यात काय तर जे करताय त्यात आनंद शोधायला शिका...सगळा जागाच माग आनंदमय  होऊन जाईल...