Tuesday, 28 August 2012

पुणे - मुंबई व्हाया NH ४

पुणे - मुंबई व्हाया NH ४

खूप दिवसापसुनची इच्छा होती कि, आपण एकदा तरी पुणे-मुंबई हा प्रवास NH ४ ने करावा . शेवटी मागच्या रविवारी आम्ही पुणे मुंबई हा प्रवास NH ४ ने केला . आणि खर सांगू का? मला तो highway इतका आवडला आहे कि काय सांगाव!
आजपर्यंत प्रवास केल तो फक्त EXPRESSWAY  वरून, पण expressway कधी आपला वाटलाच नाही। कधी आतमध्ये जाऊन भिडलाच नाही . तो मनाला भावतो फक्त पावसाळ्यात , एरवी मला तो कधीच आवडला नाही .पण NH ४ तसा नाही, तो छोट्या छोट्या गावांनी वेढलेला आहे . अधे मध्ये दिसणारी लोकं , गाड्या, घरं , शेतं सगळ करा मोहवणारं . आणि अधून मधून येणारी पावसाची झड ...अहाहा !!
NH ४ वरून प्रवास केला आणि वाटल कि expressway एखाद्या sophisticated घरातला असावा ...सगळ जिथल्या तिथे ...आणि NH ४, एखाद्या अघळपघळ घरातला, दोन्ही हात पासून स्वागत करणारा ...त्यातून खंड्याळ्याला त्याच सौंदर्य काय वर्ताव ....
आता कधीच Expressway वरून जायची इच्छा नाही ..:)