जादु , निसर्गाची जादु . पानांमध्ये दडलेली , फुलांमध्ये लपलेली . निसर्गाचा अविष्कार म्हणजे जादु .
त्याने दिलेली झाडं , पानं , फुलं , त्याच अस्तित्व म्हणजे जादु .
मनाला मोहिनी घालणारं , मनाची बंद कवाड उघडणारं , विरळाच असेल कुणी जो या जादु कडे आसक्त होत नसेल .
माझ्या बाल्कनी मध्ये मी काही झाडं लावली आहेत . खूप मस्त वाटतं. ते अवलंबून आहेत माझ्यावर आणि मला आवडते त्यांची काळजी घ्यायला .
मला आवडतं माझ्या बाल्कनी मध्ये बसून या जादूचा आस्वाद घ्यायला . झाडांवर येणारं नवीन पान , फुल , हे सगळ न्याहाळताना वेळ कसा जातो काही कळत नाही . प्रत्येक नवीन येणारं पान , त्याचा कोवळा रंग , हळू हळू मोठ होत जाताना बदलणारा , जास्तीत जास्त हिरवा होत जाणारा रंग , आणि मग त्याच्या कडांवर येणारं पिवळेपण . सगळ जीवनचक्र दिसतं त्यात . गळणाऱ्या पानाबरोबर नवीन येणारी पण पण खूप काही सांगून जातात .
झाडांवर नवीन कळ्या दिसल्या कि जास्त गम्मत येते बघायला . खूप नाजूक असतात काही , तर काही हिरवी शाल लपेटून येतात . जेव्हा उमलतात तेव्हा सगळीकडे एक सुंदर प्रकाश पसरल्याची जाणीव होते .