Tuesday, 20 December 2011

एक फसलेली नेशनल पार्क पिकनिक

नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी ठरलं कि आपण उद्या संजय गांधी नेशनल पार्क ला जावूया. मी , शर्वरी (माझी मुलगी) , स्मिता, सास्वती, साई सगळ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता ठाणे स्टेशन ला भेटायचं ठरवलं. मंदारन नेहेमीप्रमाण घोळ केला येण्याचा पण शेवटी त्यान पण पक्कं केल.

सकाळी उठ्ल्यावरच पाल चुकचुकायला लागली. शर्वरीन येणार-नाही येणार चा गोंधळ केला आणि फिनाल्ल्य आम्ही दोघी  ठाणे स्टेशनवर ९.३० वाजता पोहोचले...त्यामध्येच साई चा फोने आला आत्ता उठलोय आणि थोडा उशीर होईल...झाल . त्याला म्हटलं पटपट अवर आणि ये, आम्ही थांबतो. 

मी आणि शर्वरी स्टेशनवर पोहोचेपर्यंत स्मिता येऊन पोहोचली होती...अजून मंदार, सास्वती आणि साई चा पत्ता नव्हता...मग काय कराव म्हणून आम्ही नाष्टा उरकून घेतला...एकदा वाटल सगळ्यांना सांगाव कि पिकनिक कॅन्सिल केली आहे आणि मस्तपैकी घरी जाऊन झोपावं...पण नाही हौस न National park बघायची...:P
शेवटी सगळे १०.१५ पर्यन्त ठाणे स्टेशन च्या जवळच्या ST stand जमलो. ST पण लगेच आली  . "direct
 बोरीवली direct बोरीवली...पोवई मार्गे..ticket जास्त आहे" असा conductor ओरडत असतानाच आम्ही आत शिरलो. कुणीही तसदी घेतली नाही conductor ला विचार्याची कि अरे घोडबंदर रोड सोडून तू पोवई मार्गे का ST काढणार आहेस??....(दुसरा फटका)

Wednesday, 21 September 2011

खूप सारे विचार गोंधळ करताहेत...आजची news  एकदम गोंधळून टाकणारी होती. विचार करायला लावणारी होती...IIT -Bangalore च्या एका student ने आत्महत्या केली, कारण काय तर तिच्या boyfriend ने तिला facebook वर dump केल, त्याचा बदला घेण्यासाठी तिने हे केल....खरच कुणी इतका टोकाचा विचार करू शकत? असा असेल तर या पिढीला प्रेमाचा खरा अर्थ तरी कळला आहे का?? आपण कुणाचेतरी देण लागतो याचा विचार हे लोक करणारच नाहीत का? आपल्याला हे आयुष्य कुणामुळ तरी मिळाल आहे आणि त्यावर आपला पूर्ण हक्क नाही हे कधी कळणार यांना? असल्या कृतीने आपण आपल्या आई वडिलांना किती यातना देतो हे कळणारच नाही का यांना? आयुष्य म्हणजे काय फक्त boyfriend  असतो का? बाकी चे कुणीच महत्वाचे नसतात?

Sunday, 18 September 2011

प्रत्येक गोष्ट perfect असावी असा अट्टाहास कशासाठी? आपण काय कराव आणि काय नाही , परत कशापद्धतीने कराव हे आपणच का नाही ठरवत? का असा विचार करतो, अरे आपण करतोय ते बरोबर आहे का नाही ? अरे समोरचा काय म्हणेल? आपण का हे विसरतोय आयुष्य एकदाच मिळणार आहे आणि ते आपल्यापद्धतीने जगण्याचा आपल्याला अधिकार आहे....का विसरत चाललो आहे आपण हे कि आयुष्य सुंदर आहे आणि त्याचा महोत्सव करायचा आहे आपल्याला.....
आता राहिला प्रत्येक गोष्ट perfect असण्याचा अट्टाहास...कशासाठी? हा अट्टाहास सगळ्या नाशाला कारणीभूत होत नसेल ना? असा अट्टाहास बरोबर tension घेऊन येतो. का आपण आपल्या आनंदासाठी काही करत नाही? कोणत्याही यशस्वी कलावंताला विचारा तो पण हेच सांगेल त्याला आनंद देणारी कलाकृती त्याची उत्कृष्ट कलाकृती असेल माग ती बाकीच्यांना आवडो व ना आवडो....
थोडक्यात काय तर जे करताय त्यात आनंद शोधायला शिका...सगळा जागाच माग आनंदमय  होऊन जाईल...

Saturday, 17 September 2011

प्रत्येकालाच काही न काही अपेक्षा असते, मग ती आई-वडलांकडून असेल किंवा मित्र परिवाराकडून. खूप वेळा असा वाटत अरे का लोक इतकी अपेक्षा करतात? का समोरच्या माणसाला माणूस म्हणून accept नाही करत? एकदा फक्त समोरच्या माणसाला माणूस म्हणून बघा मग जाणवेल...आणि जेव्हा त्याला माणूस मानाल तेव्हा मनापासून मना. जाती, लिंग, वय यापलीकडे जाऊन माना...मग बघा . तुमच तुम्हाला जाणवेल खरच आपल्याला किती हक्क आहे इतकी अपेक्षा करण्याचा? का आपण एखाद्याला माणूस म्हणून जगायला देत नाही? का अपेक्षांचं ओझं लादतो?
मग कुणाकडून अपेक्षा करायच्याच नाहीत का? नाही कोण म्हणत? पण लादू नका. कारण लादल्या गेलेल्या अपेक्षा liability ठरतात . अपेक्षा एवढीच असावी कि पुढचा माणूस प्रगती करू शकेल...आणि ती पण positively असा नको व्हायला कि अवास्तव अपेक्षांमुळे त्याची वाढ खुंटेल आणि तो अशा परिस्थितीत अडकेल कि कुणीच मदत नाही करू शकणार...
प्रत्येकानंच हे तारतम्य बाळगलं तर कितीतरी जण सुखी होतील....



सत्य

सत्य म्हणजे काय? जे आपण मानतो ते? जे आपल्याला दिसत ते? कि जे दुसर्याला दिसत ते? काय असत कोणत्याही गोष्टीच सत्य? आपण कितीही मानल एखादी गोष्ट खरी आहे तरी कालांतराने ती आपल्याला खोटी का वाटू लागते? मग यामध्ये आपल्या सगळ्या भावना आल्या , सगळे नातेवाईक आले...खरच काय असत सत्य?
का फक्त तो क्षण खरा असतो? जर असा असेल तर आपण तो क्षण तिथेच का सोडून देत नाही? का धरून ठेवतो?  तो क्षण कसाही असेल चांगल किंवा वाईट , परत हे पण आपल्याच मनावर आहे...काय चांगल आहे आणि काय वाईट आहे? खूप जास्त गोंधळ आहे...:) मी पण का नाही सोडून देत? गोयेन्काजी हेच तर सांगतात सोडून द्या..सगळं temporaray आहे. यातलं खर काहीच नाही..आज एखादी गोष्ट जर खरी वाटत असेल तर उद्या ती खोटी पण वाटू लागते............
मग जे जग माझ्या अवतीभवती उभ आहे ते तरी खर आहे का? का तो पण भास? माझ्या मनान निर्मिलेला? असा म्हणतात पक्क्ष्याना हे जग काळ-पांढर दिसत..मग खर जग कोणत? काळ-पांढर दिसणार कि रंगीत दिसणार?
आज सकाळी office ला जाताना सहज मनात विचार आला...खरच का धडपडतोय आपण इतके?कशासाठी? आयुष्य जगण्यासाठी या या गोष्टी गरजेच्या आहेत हे कुणी ठरवलं? मला काय हव आहे आणि काय नको हे कोण ठरवत? कहरच जे मला हव आहे असा वाटतंय ते हव आहे का? का उगाच एखादी गोष्ट मनात आली म्हणून हवी आहे??...
मला जे हव आहे ते खरच हव आहे कि आजूबाजूला जे घडतंय त्याचा परिणाम आहे? आजूबाजूच्या घाडणाऱ्या गोष्टी मी टाळू शकत नाही पण त्यामुळे मी किती वाहवत जातेय हे कस कळणार?खूप गोष्टी मागे सुटल्यात...आणि आता कितीही केल तरी ना मागे जाता येणार आहे ना त्या गोष्टी परत मिळणार आहेत. आयुष्य हे बदलत राहत, मान्य. पण किती बदलाव?? का बदल त्रासदायक वाटतोय? का मन सगळ सोडून त्या काळ्या मातीकड परत जाण्यासाठी धडपडतंय?????