सत्य म्हणजे काय? जे आपण मानतो ते? जे आपल्याला दिसत ते? कि जे दुसर्याला दिसत ते? काय असत कोणत्याही गोष्टीच सत्य? आपण कितीही मानल एखादी गोष्ट खरी आहे तरी कालांतराने ती आपल्याला खोटी का वाटू लागते? मग यामध्ये आपल्या सगळ्या भावना आल्या , सगळे नातेवाईक आले...खरच काय असत सत्य?
का फक्त तो क्षण खरा असतो? जर असा असेल तर आपण तो क्षण तिथेच का सोडून देत नाही? का धरून ठेवतो? तो क्षण कसाही असेल चांगल किंवा वाईट , परत हे पण आपल्याच मनावर आहे...काय चांगल आहे आणि काय वाईट आहे? खूप जास्त गोंधळ आहे...:) मी पण का नाही सोडून देत? गोयेन्काजी हेच तर सांगतात सोडून द्या..सगळं temporaray आहे. यातलं खर काहीच नाही..आज एखादी गोष्ट जर खरी वाटत असेल तर उद्या ती खोटी पण वाटू लागते............
मग जे जग माझ्या अवतीभवती उभ आहे ते तरी खर आहे का? का तो पण भास? माझ्या मनान निर्मिलेला? असा म्हणतात पक्क्ष्याना हे जग काळ-पांढर दिसत..मग खर जग कोणत? काळ-पांढर दिसणार कि रंगीत दिसणार?
No comments:
Post a Comment