मी शाळेत असताना, १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी ला, कोल्हापूर मधे , रस्त्यावर जागोजागी जिलेबी तळणार् यांचे मंडप लागलेले असायचे. सगळीकडे तो गोड़ वास पसरलेला असायचा. त्या दिवशी ध्वजवंदनाला जायची गडबड असायची, त्यामुळं मी बाबांना सांगुन ठेवायची की तुम्ही जिलेबी घेवुन या.
जशी शाळेतुन परत या़यचे आधी जिलेबी आणली आहे का ते बघायचे. नसेल तर आईकडून पैसे घेउन स्वारी क्षणात निघायची. आमच्या घराच्या मागेच एक जिलेबी तळणारा बसलेला असायचा. एका मोठ्या परातीत पाकातुन काढलेल्या जिलेबींचा ढीग असायचा, आणि दुसरीकडे तो गरम गरम जिलेबी तळत असायचा.सगळीकडे मस्त वास पसरलेला असायचा. त्या वासानी जिलेबी ची भुकअजुन चाळवायची. जिलेबी घेवुन मी घरी धुम ठोकायचे. आणि मग जो आडवा हात मारायचे की ज्याच नाव ते. गरम गरम जिलेबी मिटक्या मारत खाण्याची मज़ा काही औरच....
आता कुठुनही जिलेबी तळण्याचा वास आला , तरी मला माझे शाळेतले दिवस आठवतात.
