परवा स्वमिनाथच्या लग्नात बरेच वर्षांनी आम्ही सगळे बहिण भाऊ एकत्र आलो. स्वामिनाथ म्हणजे माझ्या तीन नंबर काकाचा मुलगा . आता या आधी आमच्या कुटुंबाविषयी सांगते जरा . माझे बाबा धरून ५ भाऊ होते (त्यातले २ काका खूप अकाली गेले . ३ नंबर चा नंदुकाका आणि ४ नंबर चा अप्पाकाका), आणि २ आत्या . एक बाबांपेक्षा मोठी आणि दुसरी लहान .
मोठे तात्याकाका , त्यांना तीन मुली आणि एक मुलगा. प्रज्ञाताई (तिला एक मुलगा आणि एक मुलगी ), संज्ञाअक्का ( तिला दोन मुली आणि दोन जुळी मुलं ), तिसरी बाबी म्हणजे पौर्णिमा (तिला दोन मुलं ), आणि पप्पू म्हणजे गुरुप्रसाद (याला एक मुलगा )
दुसरे बाबा , त्यांना आम्ही दोघेच , केदार ( दोन मुलं) आणि मी (एक मुलगी).
तिसरा नंदुकाका , त्याला एक मुलगी आणि एक मुलगा. चिमी म्हणजे अमृता (हिला दोन मुलं ) आणि मिन्या म्हणजे स्वामिनाथ (याचाच नुक्त लग्न झालं )
चौथा अप्पाकाका , याला एकच मुलगी , मुक्ता (तिला पण एकंच मुलगी )
पाचवा हेमाकाका , त्याला एक मुलगी आणि एक मुलगा, तेजश्री (दीडच वर्ष झालंय लग्नाला ) आणि हरीश (FY agri. )
मोठी आत्या म्हणजेच माईआत्या , तिला तीन मुली . वासुन्धाराक्का (हिला दोन मुलं ), वैशालीताई (हिला दोन मुली ) आणि मृदुला ( हिला एकच मुलगा )
लहान आत्या म्हणजे माया आत्या , तिला एक मुलगी आणि एक मुलगा . विभावरी म्हणजे आमची राही (हिला एकच मुलगी ) आणि आदया म्हणजे आदित्य (याच लग्न लवकरच करायचं आहे )
आता बघा , एवढं मोठं बारदान असेल तर प्रत्येक कार्यक्रमाला कुणाच न कुणाच काही ना काहीतरी कारण निघणारच .
म्हणूनच मिनुच लग्न स्पेशल ठरलं . कारण १-२ मुलं सोडली तर आमची सगळी पिढी आणि मागची सगळी पिढी हजर होती . बघता बघता गप्पा रंगल्या . कोण काय काय करंत यावरच्या गप्पा गॉसिप मध्ये कधी बदलल्या काही कळलंच नाही .
कुठतरी मनाला जाणवुन गेलं , आमच्यातले काही चाळीशीच्या वरचे झालेत, तर काही जवळ पोहोचलेत. आता आमची पिढी 'मोठी लोकं' या पंक्तीत यायला लागली तर. हळुहळू पुढच्या पिढीचं राज्य सुरु होणार .
बरेचदा असं वाटायचं , आपण एकमेकांना भेटलो नाही तर आपली मुलं त्यांच्या मामे , मावस भावंडाना ओळखतील का ? आमच्या वेळी हे सगळ सोप सुटसुटीत होतं . सगळे जवळपास राहत असल्यामुळे काही न काही कारणाने येण जाण व्हायचंच . पण आता मात्र नोकरी निमित्ताने आम्ही सगळेच विखुरलो आहोत , कुणी बेंगलोर , कुणी पुणे , कुणी ठाणे , काहीजण कोल्हापूर , तर काहीजण कोल्हापूर जवळ सांगली , गारगोटी , कारदगा , त्यात मुलांच्या परीक्षा , नोकरी आणि सासरच्या कार्यक्रमांना प्राधान्य . मग काय ? मधली काही वर्ष बघता बघता हातातुन निसटून गेली.
या लग्नामुळे निदान पुढची पिढी एकमेकाला तरी . पुढे हीच नाती कितपत सांभाळली जातील माहिती नाही , पण जोपर्यंत आमची पिढी आहे तोपर्यंत तरी हे नातेसंबध नक्कीच जपले जातील .
सगळ्यात मोठ्या ताईचा मुलगा LLB व्हायच्या मार्गावर आहे तर सगळ्यात धाकट्या काकाचा मुलगा FY (agri. ) करतोय . या सगळ्या वयातल्या आम्हाला मात्र जाणवतंय , आपण आपले लहानपणीचे दिवस परत जगवले पाहिजेत .
प्लान तर ठरतोय , वर्षातून एकदा भेटायचा , फक्त सगळ्यांना जमलं पाहिजे .