आज श्रावणातील पहिला सोमवार . उपवासाचा सोमवार , असा म्हणायचं कारण कि माझ्या लक्षात तो तसाच आहे . आता मी उपवास वगैरे काही करत नाही पण श्रावणातील सोमवार म्हटलं कि मला हेच आठवतं .
शाळेत असताना मला श्रावण सोमवार खूप आवडायचे. सकाळपासूनच काहीतरी वेगळ आहे हे जाणवत राहायचं . खूप छान वाटायचं , उगाचच. आईला जेवण बनवायचं नसल्यामुळे तर जास्तच छान वाटायचं . तिच्या भोवती भोवती करत राहायचे मग मी. ती पण ओरडायची नाही अशा वेळी. आम्ही कर्नाटकी ब्राह्मण म्हणजे सीमेवरचे , आमच्यात उपवासाला हळद न घालता केलेलं दडपे पोहे , शिरा किंवा कांदा आणि हळद न घालता केलेले उप्पीट चालतं. त्यामुळे त्यादिवशी सकाळी नेहमीच्या पोळी - भाजी ऐवजी असा काहीतरी असायचं आणि बरोबर साबुदाण्याची खिचडी वगैरे . दुपारी शाळेत खायला पण हेच असायचं . श्रावण सोमवारी आमची शाळा लवकर सुटायची , ४ वाजता .शाळेतून परत येताना घराघरातून येणाऱ्या वासानी आधीच खूप भूक लागलेली असायची. कधी एकदा घरी जाऊन जेवेन असा होवून जायचं . त्या दिवशी आई-बाबा पण लवकर यायचे . आई आल्या आल्या स्वयंपाकाला लागायची . उपवास सोडायचा म्हणून थोडसं काहीतरी गोड बनवलेलं असायचं . बाबा देवाची पूजा करून नैवेद्य दाखवायचे आणि मग आम्ही जेवायचो . अगदी ६-६.३० वाजता जेवण होवून पण जायचं आमचं . मग आम्ही दंगा करायला मोकळे होवून जायचो . जेवण लवकर झाल्यामुळे झोपेपर्यंत परत भूक लागायची . पण उपवास सोडला आहे ना ? मग आता काही खायचं नाही असा आई दटावायची, पण अगदी झोपताना थोडंस दुध द्यायची.
आजही श्रावण सोमवार येतोच पण आता तो वेगळा वाटत नाही . रोजच्या सारखाच एक दिवस , नेहमीसारखाच आठवड्याची सुरवात करणारा दिवस. आजच्यासारख कधीतरी जाणवत अरे तसा सोमवार हवा , वाट बघायला लावणारा , उपवासाला पोहे आणि शिरा खायची इच्छा असणारा. लवकर घरी येवून जेवण करायला लावणारा , असा श्रावण सोमवार , हरवलेला .