मला वक्तृत्वाची आवड पहिल्यापासून होती. पण नाटकांची आवड मात्र ५वी पासून लागली. त्याचं झालं असं, ५वी मध्ये असताना सगळ्यात पहिल्यांदा मी एकांकीकेमध्ये काम केलं.एकांकीकेचं नाव होतं, पु. ल. देशपांडे लिखित 'वयम् मोठम् खोटम्'.
तर झालं असं, ५वी आणि ६वी च्या सगळ्या तुकड्यांमधून नोटिस फिरली, सगळ्या विद्यार्थ्यांनींनी शाळा सुटल्यावर तळघरात जमावे. त्याप्रमाणे आम्ही सगळ्याजणी तळघरात जमलो. बाईंनी सगळ्यांना बालभारतीचं पुस्तक काढून धडा वाचायला सांगितला. अगदी ५-५ ओळी वाचल्या प्रत्येकीने. मग आमच्यामधील काही जणींना घरी जायला सांगितले. आता आम्ही फक्त २०-२५ जणीचं राहिलो. मग बाईंनी आम्हाला एक पुस्तक दिलं आणि त्यातील एक पान वाचायला सांगितलं . माझं वाचून झाल्यावर मला बाजूला बसायला सांगितलं. अजून १-२ जणी पण माझ्याबरोबर होत्या. उरलेल्या मुलींपैकी ३-४ ना घरी जायला सांगुन , बाईंनी परत एकदा वाचन घेतलं. असा करत करत आम्ही ६जणीच राहिलो फक्त. बाईंनी सांगितलं , ' तुमची नाटकात निवडं झाली आहे. उद्या माझ्याकडे येवून प्रत्येकीने पुस्तक घेवून जायचं आहे'.
मी पळत पळतच घरी आले. याआधी एकांकीकेत कधीही काम केलं नसल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. आईला पण खुप कौतुक वाटलं. दुसर्या दिवशी बाईंकडे जाऊन पुस्तक घेवून आले आणि सगळ्यात आधी ते वाचून काढालं. मला कुणाचं कुणाच काम मिळणार माहिती नसल्यामुळे उत्सुकता खुप होती. सगळ्यात आधी वाचनाची तालीम सुरु झाली आणि कळलं कि मी मुख्य भूमिकेत असणार आहे, 'आजोबा' च्या. एकांकीकेची सुरवात आणि शेवट माझ्याच वाक्याने होणार होता.
रोजच्या रोज तालीम सुरु झाली आमची. शाळा सुटल्यावर तळघरात जमत असू आम्ही. दुसर्या कुणालाही आम्ही काय करतो हे कळू नये म्हणून बाई खबरदारी घ्यायच्या. आमची एकांकीका होती ती मुख्याध्यापक संघाच्या स्पर्धेसाठी. इथे मुलाचं आणि मुलींचं अशा दोन एकांकीका जातात. आणि मुलींची एकांकीका बसवणाऱ्या बाई आणि मुलाची एकांकीका बसवणारे सर यांच्यात पण स्पर्धा असायची. म्हणून बाई खबरदारी घ्यायच्या. असो, बघता बघता आमची एकांकीका आकाराला यायला लागली. खूप मज्जा यायची त्यावेळी. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे आम्हा सगळ्यांना सगळी एकांकीका पाठ झाली होती. त्यामुळे कुणी कुठे चुकली तर बाकीच्या सगळ्या भूमिकेचं भान विसरून तिला तीच काय चुकलं याची आठवण करून द्यायच्या. बाई ओरडायच्या मग आम्हाला.
कधी कधी आम्हाला तळघर मिळायचं नाही तालीमीसाठी, मग बाई रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत आमची तालीम घ्यायच्या.
स्पर्धेचा दिवस जसजसा जवळ यायला लागला तशा आमच्या तालमी पूर्ण पूर्ण दिवस व्हायला लागल्या. एकदा असाच बाईंनी आमची एकांकीका ६वी च्या वर्गासमोर करायची ठरवली. आधी आमच्या मधल्या ६वी च्या मुली लाजल्या . पण एकदा एकांकीका सुरु झाल्यावर मात्र आम्ही सगळ्या भान विसरून गेलो. आणि, तेवढ्यात आमच्यामधली एकजण वाक्य विसरली. आम्ही सगळ्यांनी तत्परतेने तिला आठवण करून दिली. समोर बसलेला प्रेक्षकवर्ग फिदीफिदी हसायला लागला. आणि आम्हाला कळलं काय झालं आहे ते. आमच्यात हिम्मतच न्हवती बाईंकडे बघायची. आता मात्र बाईंनी बजावलं आम्हाला. आम्ही पण हो हो म्हटलं .
आमची एकांकिका स्पर्धेत काहीही विघ्न न येता सादर झाली. आणि, विशेष म्हणजे दुसर्या क्रमांकाने आम्ही ती स्पर्धा जिंकली पणं. मलापण पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळालं. काही दिवसांनी बक्षीस समारंभ होता . मला बेबी शकुन्तालांच्या हस्ते बक्षीस मिळालं.
या एकांकिकेने खूप काही दिला मला. माझा आत्मविश्वास वाढवला, नाटकांची गोडी लागली , वाचनाची आवड निर्माण झाली , पाटील बाईंसारख्या बाई मिळाल्या. शाळेत नंतर जरी एकांकिकेत कामं केली तरी , 'वयम् मोठम् खोटम्' च्या वेळेची मजा काही औरचं होती.

यामध्ये जी आजोबा आहे ती मी आहे .
बेबी शाकुंतलाच्या हस्ते बक्षीस घेताना
याच नाटकाची अजून एक आठवण म्हणजे आमच्या शाळेच्या शिक्षक दिनी ज्याला आम्ही केळवकर दिन म्हणतो, त्या दिवशी या एकांकिका सगळ्या मुलांपुढे सादर करायच्या असतात . त्या वर्षी भालजी पेंढारकर आले होते. मला अजूनही लख्खं आठवतं, एकांकिका संपल्यावर त्यांनी मला बोलावून आशीर्वाद दिले होते.
त्यांनतर काय आपली जागा फ़िक्स झाली. दरवर्षी असायचेच , अपवाद फक्त ६ वीं आणि ८ वी चा. ८वी मधे मी संगीत संशयकल्लोळ मध्ये 'फाल्गुनराव' च काम केलं होतं.

९ वी मध्ये केलेले नाटकं . नाव विसरले आता :(