Monday, 12 May 2014

मे महिन्याच्या आठवणी

शर्वरीची सुट्टी सुरु झाली कि मला माझी सुट्टी हटकून आठवते . कधी एकदा परीक्षा संपतेय असा होवून जायचं मला. शेवटच्या पेपर चा अभ्यास कधीच व्हायचा नाही माझा. आणि जशी परीक्षा संपायची तशी एकदम खुश होवून जायची मी. फारसे प्लान नसायचेच. म्हणजे आताच्या पिढीचे प्लानिंग बघितली कि वाटत , बापरे! किती हि तयारी सुट्टीची!पण आमच्यावेळी सगळ बाबांच्यावरती अवलंबून असायच. वात बघत असायचो बाबा कधी एकदा बेळगाव ला घेवून जातात याची. आम्ही सगळे एकदम जायचो, म्हणजे मी, केदार , मोठे काका-काकू, त्यांची ४ मुलं. धमाल असायाची.
  बेळगाव ला ४नंबर काका राहायचा माझा. प्रत्येक मे महिन्यात त्याच्याकडे दत्तउत्सव असायचा. अजूनजुचे खूप लोक यायचे . खूप धमाल असयची. पंगती वर पंगती उठायच्या. आम्ही सगळे खूप मस्ती करायचो.
बेळगाव ला जाण्याची वाट बघण्याच कारण अजून एक होत, बाबा संकेश्वर ला एस. टी कॅन्टीन चा मेदुवडा आणि चटणी आणायचे. गाडी सुरु झाली कि कधी एकदा संकेश्वर येत याची आम्ही वात बघयचो. आम्हा सगळ्या भावंडांचा आवडता पदार्थ होता तो. आम्ही सगळे मोठ्या चवीने खायचो. अजूनही त्याची चव आठवते मला.
बेळगाव ला काका त्यावेळी अनगोळ माळ ला राहायचा. त्यानंतर त्याने ३-४ घरे बदलली पण माझ्या जास्त लक्षात राहिलेलं त्याच घर म्हणजे अनगोळ माळा वरचच. ४खोल्या , मागे अंगण आणि पुढे अंगण. पुढच अंगण भलामोठ होतं. तिथे मंडप घातलेला असयचा. आम्ही सगळी भावंडे तिथेच झोपायचो. आम्हा सगळ्यात भर पडायची ती म्हणजे माझ्या दोन आत्यांच्या मुलींची. आम्ही सगळे जवळ जवळ सारख्याच वयाचे आहोत, त्यामुळ दंगा धुडगूस तर बघूच नये, इतका असयचा. आणि त्यात भर म्हणजे जवळ राहण्या-या  मुलांची .सकाळी ६.३०-७ ला सुरु होणारा दिवस संध्याकाळी देवाच्या आरतीने संपायचा. सगळ्या आरत्या मोठ्याने म्हणायची आमची स्पर्धा असयची. मोठ्यामोठ्याने टाळ वाजवत आम्ही आरत्या म्हणायचो, आणि मधेच कुणी चुकला तर फिदीफिदी हसायचो. माग कुणीतरी मोठ आमच्याकडे डोळे मोठे करून बघायचे. तेवढ्यापुरते शांत व्हायचो आम्ही आणि थोड्यावेळात परत सुरु… आरती झाली रे झाली कि प्रसाद वाटायला आम्ही सगळे पुढे, ३-४ प्रकारचे प्रसाद असायचे.
रात्रीची आरती झाली कि पंगती बसायच्या, फारशी भूक नसायची कारण दिवसभर काही ना काही सुरु असायचच. माग मंडपात अंथरूण पडायची . पण लगेच झोपली तर ती वानरसेना कसली?? कुणाच्या नकला, कुणाचा नाच, कुणाच्या गोष्टी, भेंड्या, भांडण असा सगळ साग्रसंगीत व्हायचं आणि माग आजी किंवा काकू ओरडली कि झोपायचो. 
 खरच, खूप सुंदर दिवस होते. मनमुक्त जगण्याचे दिवस. ते परत तर येणार नाहीत पण त्यांनी निर्माण केलेल्या आठवणी मात्र नेहमी बरोबर असतील. एका सुंदर बालपणीच्या आठवणी.


7 comments:

  1. सहीच... लहानपणीच्या शाळेच्या सुट्टीतल्या आठवणी जबदस्त असतात. आमची सुट्टी म्हणजे नरसोबावाडी... अनेक वर्षे पोहणे शिकायचे प्रेमळ आणि जबरदस्तीचे सर्व प्रयत्न करून शेवटी तलावातच शिकलो. आम्ही तिथल्या देवळात वर्षिली असली कि बसायचो. भरपूर पेढे आणि दक्षिणा :)
    खरच रम्य दिवस होते ते. सुट्टी म्हणजे जग कुठे आहे आणि आपण कुठे हे कळायचेच नाही. बेळगाव बद्दल मला एक असेच आकर्षण आहे. कधी गेलो नाही. पण मला तिथला कुंदा फार आवडतो.

    ReplyDelete
  2. खर आहे आशिष तुझं . सुट्टीच जगच वेगळ होता बघ. मनसोक्त हुंदडणे याशिवाय काहीही महत्वाच असायचं नाही . आणि मला पण कुंदा अतिशय आवडतो . गेल्या कित्येक वर्षात खाल्लाच नहिये. मध्ये कधीतरी एकदा बेळगाव ला जाण झाल होत. बराच काही बदलल आहे आता . काका जाऊन पण बरीच वर्ष झाली . तो गेला आणि बेळगाव शी असणारा नात तुटलं . पण अजूनही त्याबद्दलच आकर्षण तसाच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. वय वाढेल तसं माझ्यासाठी या सुट्टीच आकर्षण वाढत चाललंय. अशी सुट्टी आयुष्यात परत मिळणार नाही याच दुख: आपल्या इतकं कोणाला समजणार? :)

      Delete
  3. मॅम खूप छान लिहिले आहे.

    Especially हा लहानपणीच्या आठवणीचा ब्लॉग वाचताना मला पण वाटले मी पण माझ्या मे महिन्यातल्या आठवणी इथे share करू…. पण आठवणी शब्दांत उतरवण्यास आपल्यास काही जमणार नाही ते… :-(

    हा पण मे महिन्याची भिती पण वाटायची आणि आतुरतेने वाट सुद्धा बघायचो, भिती या साठी कि परीक्षेचा result असायचा आणि तोही आम्हांस पोस्टाने मिळायचा आणि तो कधी येईल हे काही माहित नसायचे (पोस्ट खात्याचा कारभार आपणास ठाऊक आहे), देवाकडे एकच प्राथना करयचो कि देवबाप्पा पोस्टमन काका वाढदिवसा नंतर result घेऊन येउदे :-p , नाहीतर ह्यावर्षी सुद्धा मागील वर्षी चे गिफ्ट परत पुढल्या वर्षी मिळेल :-(

    ReplyDelete
  4. खर आहे आशीष .

    ReplyDelete
  5. Just read your blog, u r an excellent writer. Read a simple and fresh Passage after long time
    I am not able to type in Marathi, hope u don't mind that. Look forward to next blogs.

    ReplyDelete
  6. आभारी आहे कौस्तुभ . नक्कीच , मला पण आवडतं आहे आता लिहायला.

    ReplyDelete