Tuesday, 20 May 2014

लोकल चा प्रवास

कोल्हापूर सारख्या छोट्या शहरातुन मी जेव्हा कळव्याला राहायला आले, तेव्हा भांबावून गेले होते. रुजलेलं रोपट नवीन जागेत लावल्यावर सुरवातीला जसा मरगळतं , तशी अवस्था झाली होती. मुंबई तशी अनोळखी कधीच न्हवती. सिनेमापेक्षा व. पुं. च्या पुस्तकामधून मुंबईतील पाळणारा माणूस जास्त भेटला होता. एकीकडे सगळ्यांनी घातलेली भीती आणि दुसरीकडे व पुं च्या पुस्तकामधून दिसलेली माणुसकी . कसा मेळ घालणार होते देव जाणे.
अगदी सुरवातीच्या दिवसातली गोष्ट आहे. आम्हाला बांद्र्याला जायचं होतं. मी नवीनच असल्यामुळे मला लोकल मध्ये कितपत चढायला मिळेल असा वाटून उपेंद्रने एस. टी. ने जायचे ठरवलं . त्याप्रमाणे आम्ही मुलुंड पूर्वेला जाउन एस. टी.  पकडली. नॉर्मली जिथे पोहोचायला जास्तीत जास्त एक तास लागतो, तिथे आम्ही अडीच तासाने पोहोचलो. मी एस टी मध्ये खिडकी शेजारी बसले होते. याधी दोन वेळा मी मुंबई मध्ये येवून गेले होते पण त्याला फार वर्ष झाली होती . आधीच मला काही आठवण शक्य पण न्हवत. लहान मुल जसा नवीन खेळणं मिळालं कि तहान भूक विसरतं, तसा काहीसं शाल होत माझं. मी खिडकीबाहेरच बघत होते आणि तेवढ्यात मोठ्या आवाजात अचानक सुरु झालेल्या भांडणान तंद्री मोडली माझी. कंडक्टर आणि एक प्रवासी याच चांगलाच जुंपल होतं . प्रवाश्याकडे सुट्टे पैसे न्हवते आणि कंडक्टर कडे पण न्हवते. त्यावरून अगदी भ च्या बाराखडीतल्या शिव्या देवून दोघा पण भांडत होते. त्या कंडक्टर ने त्याला उतरून दिले. मी बघतच बसले. बापरे! कोल्हापूर मध्ये राहून पण पुर्णपणे ब्राह्मणी संस्कृतीत वाढलेल्या मला असा काही ऐकायची सवय न्हवति. खूप घाबरले होते त्यावेळी.
आता मात्र सगळ्याची सवय झाली आहे. लोक शिव्या  देतात , हमारी तुमरीवर येतात पण तेवढ्यापुरतेच . नंतर सगळं शांत असतं. अशा या मुंबईच्या आठवणी मात्र खूप आहेत. खूप काही शिकवलं हिने . सुरवातीला लोकल ने प्रवास करायला घाबरणारी मी नंतर मात्र सर्रास फिरू लागले. खूप वेगवेगळे अनुभव आले . सुरवातीच्या काळात आम्ही व्ही टी ला गेलो होतो, कशासाठी ते आठवत नाही आता. परत येताना उपेंद्रने मला लेडीज डब्यात बसवलं  आणि तो जेन्ट्स डब्यात शिरला. माझा पहिला लोकल प्रवास होता तो. ठाण्याला आपल्याला उतरायचं आहे असा त्याने सांगितलं मला. आणि माझ्या आजूबाजूच्या बायकांना सांगितला हिला ठाणं आल कि सांगा . त्या पण बायकांनी हो म्हणून सांगितलं . नंतर त्यांनी विचारलं पहिल्यांदा आली आहेस का? मी मानेनच हो म्हटलं. मला त्यांना उत्तर द्यायची पण भीती वाटत होती. आता आठवल कि जाम हसु येतं.
त्यानंतर काही दिवसांनी मी नोकरी करू लागले आणि लोकाल चा प्रवास माझ्या अंगवळणी पडला. मुंबई मधली माणुसकी बघायची असेल तर ती तुम्हाला लोकल मध्ये नक्की दिसेल. लहान मुल घेवून चढणाऱ्या बायकांच्या मुलांना मांडीवर घेण्यात दिसेल, गरोदर बाईला किंवा एखाद्या आज्जीला बसायला जागा मोकळी करून देण्यात असेल, कुणाला चक्कर आली तर पाण्याच्या बाटल्या पुढे होतातच पण चोकलेट आणि गोळ्या पण पुढे येतात.
असाच एकदा ऑफिस मधल ऑडीट च काम उशिरा संपवून येताना , दादर ला एक भिकारिण  चढली. बरोबर ९-१० महिन्याची मुलगी होती. मुलगी मोठी गोड होती. तहान लागली होती त्या छोटीला. तिने कुरकुर करायला सुरवात केली. गाडीत आम्ही ५-६ जणीच होतो. कुणाकडेच पाणी न्हवतं. ती भिकारीण थोडी वेडी पण असावी. एकटीच मोठ्यामोठ्याने बडबडत पण होती. गाडी कांजूर ला थांबली आणि हि त्या मुलीला सोडून खाली उतरली, पाणी आणायला. आणि गाडी सुटली . आम्हाला कुणालाच कळेना काय कराव ते. गाडीत पोलिस होता त्याला सगळ्यांनी सांगून बघितलं, अहो गाडी थांबवा. पण तो म्हणाला , नाही , गाडी कशाला थांबवायची? मी ठाण्याला उतरणार आहे , तिथ या मुलीला आश्रमात सोडतो , तसा पण ती भिकारीण कुठ सांभाळणार आहे? त्याच्या बोलण्यावर आम्ही चुटपूटात गप्प बसलो. गाडी ठाणे स्टेशन ला आल्यावर तो पोलीस त्या मुलीला घेवून गेला. झालं ते बरोबर झालं नाही असा वाटून हि गोष्ट  मनाला खुप लागुन राहिली.
अशा या लोकल प्रवासात एकदा मोबिले हरवून झाला आहे माझा, एकदा सोन्याच ब्रेसलेट पण. काहीही असाल तरी लोकल चा प्रवास मला आवडतो . तो नुसताच प्रवास नसतो तर एक जाणीव असते, लोकांच्या जगण्याची. 

2 comments:

  1. मुंबई म्हटलं की माझी आठवण खुंटते. एकतर एखादी मुलाखत अथवा परदेश गमन. तिथले हवामान मला अजिबात झेपत नाही. घामाने मी बेजार होतो. लोकलचे ठीक आहे. पण स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकांची अगतिकता जास्त जाणवते मला.
    लोकलचा प्रवास एकदा सवयीचा झाला की मजा नक्कीच येते. पण याचा लोकलमुळे गाडी न चालवणारे अनेक मुंबईकर पाहिले आहेत. मला वाटत की माणसांच्या गर्दीत माणुसकी भेटतेच अनेकदा कारण माणूस तेच तर शोधत असतो.
    एक निरिक्षण असेही आहे की मुंबईकर आणि कोल्हापूरकर पटकन जुळवून घेतात पण पुणेकरांचे दोघा सोबत सुद्धा फार चांगले पटकन पटत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. खर आहे तुझं, स्पिरीट आॅफ मुंबई हा मिडीया चा शब्द आहे. ताज वर हल्ला झाला त्याच्या दुसर्या दिवशी आम्ही आॅफीस ला होतों. सुट्टी नाही म्हणुन . पण काहीही असलं तरी हे शहर आवडत मला. कोल्हापूर इतकच

      Delete