ढगाळ हवा, पाऊस नुकताच पडून गेलेला. मी अशीच बाल्कनी मधुन बाहेर बघत बसले होते . बाल्कनी मध्ये लावलेली झाड बघता बघता मन हरवु लागलं. नजरेसमोर छान हिरवाईने नटलेला डोंगर उभा राहिला . पाउस नुकताच पडून गेल्यामुळे हवा स्वच्छ आणि प्रसन्न होती , हवेमध्ये थंडावा होता . त्या डोंगराच्या पायथ्याशी उभी होते मी. मला त्या डोंगरावर चढायच होतं . डोंगरमाथ्यावर उभ्या असलेल्या एकुलत्या एक झाडाकडे जायचं होता मला.
मी डोंगर चढायला सुरवात केली. पायाखालच्या मऊ गवताचा स्पर्श जाणवत होता , सुखावत होता. पावसाचेच दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवागार आहे , हवा थंड आहे आणि मन प्रसन्न आहे. डोंगरमाथ्यावरच ते झाड पण हिरवंगार आहे, मलाच बोलावत आहे. आणि मला मगं अचानक जाणवलं, माझ्याबरोबर कुणीतरी आहे, मला त्या झाडाजवळ घेवून जात आहे , माझ्या मनातले विचार त्याला बरोबर काळत आहेत, बोलायची गरज नाही , त्या निरव शांततेत तो माझ्या बरोबर आहे. मधूनच हलकासा शिडकावा करून वातावरण प्रसन्न करत आहे. माझा 'पाऊस' , माझा लाडका 'पाऊस'.
त्याच बरसणं बघताना कधीच कंटाळा येत नाही , तल्लीन व्हायला होतं.
असा असाल तरी संध्याकाळी भरून येणार आभाळ आणि बरसणारा पाऊस उदास करतो मला . कसलीतरी अनामिक हुरहूर दाटून येते मनात. आणि अशा वेळी सोबतीला येतात ते गुलजारसाब , अशावेळी त्यांच्या पुखराज किंवा रात पश्मिने कि वाचताना तंद्री लागून जाते . कधी कधी बरोबर असतातं ते जगजीत सिंग, हरिहरन, यांचा आवाज कुठतरी हरवून टाकतो मला. एक वेगळाच वातावरण निर्माण होत माझ्याभोवती. शब्दात वर्णन न करता येणारं, ते अनुभवायलाच हवं.
हाच पाऊस जेव्हा सकाळपासुन सुरु होतो , तेव्हा मात्र प्रसन्न वाटतं. ऑफिसला मस्तपैकी दांडी मारून कुठतरी भटकावं असा वाटायला लावणारा हा पाऊस असतो. मस्तपैकी भटकावं आणि टपरी वर मिळणारा गरम गरम चहा आणि वडापाव हादडावा.
दुपारी पडणारा पाऊस मात्र वेगळचं काहीतरी सांगतो. बर्याच जणांना चादर घेवून झोपायला लावणारा हा दुपारचा पाऊस , मला मात्र त्याच्याबरोबर खेळायला बोलावत असतो. मनसोक्त भिजावं असा वाटायला लावतो या वेळेतला पाउस. संध्याकाळचा पाउस जसा उदास करतो तसा दुपारचा पाऊस करत नाही. तो उत्साहात बरसात राहतो , मनात सुद्धा.
रात्रीच्या वेळी पडणारा पाऊस मात्र झोपायला लावतो, एका लयीत पडणारे पावसाचे पाणी बघून , त्याचा पडण्याचा लयीतला आवाज ऐकुन छान झोप येते.
दिवसाच्या सगळ्या प्रहरातला पाउस जरी मला आवडत असला तरी २६ जुलै चा पाऊस आठवला कि अंगावर आजही काटा उभा राहतो . शर्वरीला पाळणाघरात सोडलं आणि मी ऑफिसला गेले. त्यावेळी मी ठाण्यातच कॅडबरी फॅक्टरी मध्ये काम करत होते. उपेंद्र पण ऑफिसला गेला. घरी सुट्टीसाठी म्हणून आलेली अमृता आणि स्वामिनाथ (माझे चुलत भाऊ- बहिण ) होते. थोड्याचवेळात पाणी रस्त्यावर साठायला लागलं होतं. स्वामिनाथ लगेच शर्वरीच्या पाळणाघरात जाउन तिला घेवून आला . तो घेवून आला हे खूप बऱ झालं होतं, कारण नंतर तीचं पाळणाघर पूर्णपणे पाण्यात बुडलं. दुपारपर्यंत उपेंद्र पण घरी आला. त्यावेळी घरी फोन नव्हता. त्यामुळे मला काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यातच उपेंद्रच्या फोनची बॅटरी संपत आली होती , घरात लाईट नव्हती. ऑफिस मध्ये पण काही कळलं नव्हतं. शेवटी ४ वाजता कळलं कि जास्त पाऊस झाल्यामुळे मुख्य ऑफिस सोडलं आहे. मग आम्हीपण निघालो . आधीतर मला रिक्षा पण मिळायला तयार नव्हती. कसाबसा एक जण तयार झाला आणि त्याने कळवा नाक्यापाशी सोडलं . मी नेहेमीप्रमाणं घरी जायला शास्त्री नगर पाशी वळले आणि समोर समुद्र आला . १० फुटांवर जे पाणी जमा झालं होतं ते नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच होतं . जवळ जवळ सगळ्याच इमारतींचा पहिला मजला पाण्यात बुडाला होता . काठाशी काही लोक थांबले होते , त्यांनी सांगितलं,ताई , तुम्ही ठाण्यात जावा नाहीतर कुणातरी नातेवाईकाकडे जा , पण आम्ही तुम्हाला या पाण्यातून जाऊ देणार नाही . हे ऐकुन फक्त रडायची बाकी होते मी . डोळ्यासमोर शर्वरी होती , ती माझ्याशिवाय राहाणं शक्यचं नव्हतं. कसही करून मला घरी पोहोचायालाच हवं होतं . माझ्या पण मोबाईलची बॅटरी आता संपत आली होती . उपेन्द्रचा फोन लागत नव्हता. त्याला मेसेज पाठवला मी अशी अशी इथे उभी आहे म्हणून . माझ्या नशिबान त्याने फोन चेक करावा म्हणून सुरु केला आणि त्याला माझा मेसेज मिळाला. तोपर्यंत अजून कुठूनतरी घरी जाता येईल का हे बघण्यासाठी मी निघाले तिथून . पण सगळ्या वाट बंद झाल्या होत्या . परत आले तर त्या छातीभर पाण्यातून येताना उपेंद्र दिसला . मी लगेच पुढे झाले . त्याने माझा हात धरला आणि आम्ही त्या पाण्यातून निघालो. हे वाहणार पाणी पुढं खाडीला जाऊन मिळत होतं . पाण्याला वेग होता . काही मुलांनी मधेच एक रस्सी बांधली होती . तिला धरून आम्ही निघालो . माझ्या गळ्यापर्यंत पाणी येत होतं. हातातली पर्स वरती धरली होती. एकदा पाय पण सटकला माझा , उपेंद्रने धरले होते म्हणून बरे . शेवटी घरी आलो, लेकरू माझी वाटं बघत होतं . स्वामिनाथ पण घाबरला होता. आम्ही सगळे घरी सुखरूप होतो. रात्रीतून इमारतीच्या शेजारून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज धडकी भरवत होता. त्या रात्री बहुतेक कुणी झोपलचं नाही . मधेच एक गाडी वहात येताना दिसली . तशा त्या पाण्यातच काही मुलं खाली उतरली आणि त्यांनी ती गाडी रस्त्यात बांधलेल्या दोरीने एका बाजूला बांधून ठेवली . घरात लाईट नाही, पाणी नाही असे दोन दिवस काढले. नंतर त्या पावसाने केलेला हाहाकार समजला. आम्ही खरच नशीबवान ठरलो होतो.

No comments:
Post a Comment