Wednesday, 14 May 2014

उन्हाळा हवाहवासा

आता ठरवलं आहे रोज काहीतरी लिहायाचं. आपल्या आजूबाजूला इतकं काही घडत असतं कि त्यावर बोलण्यासारख खूप असतं .व्यक्त होणं महत्वाच. आपल्या नजरेन जे दिसतं ते सगळ्यांना तसचं दिसावं  यासाठी धडपड ही.
आपण आपल्या रोजच्या जगण्यात इतके गुंतून गेलो आहोत कि या उन्हाळ्यात दिलेल निसर्गाचं देण पण बघायला वेळ नाही आपल्याकडे. मे महिन्याच्या उकाड्याला नाव ठेवणारे आपण आजूबाजूला फुललेला निसर्ग बघत पण नाही. अतिशय सुंदर फुललेला लाल-पिवळा गुलमोहोर, पिवळा बहावा , जांभळा फर्न ट्री , हिरवा-पिवळा चाफा, पांढरा-गुलाबी चाफा, कवठी चाफा , आफ्रीकन ट्युलीप ट्री ,पांगिरा, पळस, सारंगा अजून बरेच सारे, आणि हे सगळे कमी काय म्हणून कुणाच्या तरी बाल्कनी मधून नाहीतर खिडकीमधून डोकावणारे गुलाब, मेफ्लोवर , लिली, मधुमालती, कामिनी, मोगरा, मोठ्या रस्त्यंावर मधोमध लावलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या बोगनवेली, .











हे सगळ कमी काय म्हणून तो आपली जीभ पण सुखावतो. आंब्याबरोबर जांभूळ, करवंद , विलायती चिंचा सारखी मेजवानी पण देतो. हा सगळा रानमेवा अतिशय चविष्ट लागतो. याच उन्हाळ्याच्या सुरवातीला झाड नवीन साज चढवून उभी असतात. 
इतकं सगळं हा उन्हाळा आपल्यावर उधळत असताना आपण मात्र हाश्श हुश्श करत त्याला नाव ठेवत असतो. आपल्या आयुष्यात येणारा उन्हाळा हा असा विविधतेने नटलेला येतो आणि जाणीव करून देतो , आजूबाजूला उन्हाच्या गरम झळा असल्या तरी तो सुंदर आहे, निसर्गाच्या सौन्दर्याची उधळण या काळात पण असते. आणि शरीराला जाणवणारा उकाडा डोळ्यांना आणि जिभेला सुखावणारा नक्कीच असतो. 

2 comments:

  1. अनघा, खरं आहे तुझ. लिहून व्यक्त होण उत्तम... तुझे पाहते आहेस आणि लिहिते आहेस त्यालाच आपण जगाकडे पहायचा सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो जो फार गरजेचा आहे. नाहीतर मग एखाद्याला शीतल सावलीत सुद्धा चटका बसतो न हसरया जगात कायम एक अश्रू दिसतोच.

    ReplyDelete