Monday, 5 May 2014

भिती

खुप इच्छा होतेय आज, एखाद्या शांत रोड वर मनसोक्त भटकाव. पण असा रोड कुठे मिळणार? सगळीकडे इतकी गर्दी आहे की काही विचारु नये. आणि जरी एखादा रोड असा शांत मिळाळा तरी तिथुन एकटं जायची भिती वाटते. इतक्या वेड्यावाकड्या गोष्टी एेकल्या आहेत की,असा रस्ता दिसला तरी एकटं जाण्याची हिम्मत नाही. किती असुरक्षित झाल आहे सगळ. लोकांची मानसिकता इतकी विकृत कशी झाली? आणि ती पण इतक्या अचानक?! बलात्कार, खुन हे तर रोजच्या जगण्याचा भाग झाल्यासारखे वाटतात आता. हे आत्ताच घडत असेल अस नाही , आिधपण घडत असणार. पण मागच्या २-४ वर्षात हे प्रकार एवढे वाढले आहेत की बोलायची सोय नाही. का आता मुलिंना बोलायला बळ मिळाळ आहे या सगळ्यांविरुध्द बोलायच? काहीही असल तरी पावलोपावली भिती वाटते एवढ़ खरं. कशाचीही शाश्वती नाही. कधी काय घडेल आणि काय कानावर पडेल याची भिती वाटतं रहाते सारखी. याला उपाय? सध्या काहीच नाही. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत शांत रोड वरुन एकट जाण्याची हिम्मत नाही ,एवढ़ खर.

4 comments:

  1. Nice thought heard by me recently....Pratek Bapape mullila firayala pratibandha ghalanyapeksh slavanyapeksha swatahchya mulala stri cha aadar karayala shikawave.

    ReplyDelete
  2. अनघा,
    तुझा मुद्दा एकदम योग्य आहे. मानसिकता बदलण सोपे नाही. ती प्रत्येत घरात आणि प्रत्येक थरात बदलण गरजेच आहे. या सोबत प्रत्येकाने भान ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून स्वैराचार करण्याची मानसिकता सुद्धा बनता कामा नये. समाज आपल्यापासून बनतो आणि म्हणून आपण स्वत:ला घडवताना भान राखण गरजेचे आहे. मग तो नारी असो वा नर.
    आपल्या भारतात समाजातले थर, मग त्यातले प्रत्येक घर, आणि प्रत्येक घरातला नर, यांना आपण एक कोण आहोत? आपली सामाजिक जबाबदारी आणि आपल्या घरातले नाते संबंध याचे आत्मपरिक्षण करणे आत्यंतिक गरजेचे आहे. अशिक्षीत समाजात स्त्रियांना दुय्यम समजण्याची मानसिकता, सुशिक्षीत समाजातले वैचारिक मागास लोकं आणि सुशिक्षीत समाजातील स्वैराचारी व्यक्तिमत्वे यांनी स्वत:ला लगाम घालणे गरजेचे आहे. स्वत:चे विचार तपासायची गरज आहे.
    आजच्या जमान्यात सहज उपलब्ध होणारी साधने, माणसांचा माणसांशी तुटत चालेला प्रत्यक्ष बोलण्याचा आणि भेटण्याचा भाग मला खटकतो. तुला जो रस्ता हवा आहे त्या रस्त्यावर मला एखाद हवं असलेल माणूस सुद्धा हरवत चाललं आहे.
    शांत रस्त्यावरून एखादीनं एकटीन जाणं आज स्वप्न आहे. हे मला पण सध्या मान्य आहे. परत लिहिनच...

    ReplyDelete
    Replies
    1. Ashya....
      Khar ahe tuz.pan are hi lok pan aaplya sarkhi ch ahet re.tyana hi mul, byeko ahet ki mag ka hya sarwancha vichar nahi yet,tyana
      Samajik jababdari,swairachar,nati..he sagale aata 1 std la shikwaychi vel aaliy..tula kay watay ki, tyana he kalat nahi..are sagal kalatay,fakt swata sathi..dusarya sathi nahi...aapan shalet hoto tya veli kahi lokanchi, thodi vegali pan ashich mentality hoti ki..Pan tyala hi strongly oppose kela ch ki...
      Manas tich ahet re fakt samaja chi bhiti kami zaliy...

      Anagha,
      Be positive...train Cha accident hoto mhanun aapan travel karan sodayach nasat...

      Delete
  3. शैलेंद्र, अरे ट्रेन चा अपघात होणा आणि बदलती सामाजित परिस्थिती खरतर बिघडलेली मानासिकता याचा मेळ कसा घालायचा ?मानसिकता बदलण गरजेचं आहे. आणि लोकांची भीती कमी झाली यापेक्षा सारासार विचार करण्याची ताकद हरवत चालली आहे.

    आशिष , बरोबर आहे तुझ. पण माग हे सगळ कसा ठीक होणार? आपल्या शिक्षणाचा हा भाग बनला पाहिजे, घराघातून संवाद वाढला पाहिजे , नुसताच आपल्या घरातला नाही तर शेजारी पाजार्यांशी पण संवाद वाढला पहिजे. पूर्वी च्या काळी पण हे प्रकार होते पण कमी होते , कारण माणसाला समाजाची चाड होती, आता तसा नहिये. कुणाला कुणाच काही पाडलेल नहिये. जो तो , माझ आणि माझ्यापुरत मध्ये अडकलेला आहे. हे सगळ बदलल पहिजे. संवाद वाढला पाहिजे .

    ReplyDelete