लहानपणी एखादी गोष्ट जरं मनात ठसली असेल तर ती कायम मनात तशीच रहाते. तसचं काहीसं माझं झालं आहे ते मुंबई आणि पुण्याबद्दल .
मी ६ वीच्या मे महिन्याची गोष्ट . माझी मावशी बदलापूर ला राहते ती आणि माझी सगळ्यात लहान मावस बहिण, जी माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी आहे , ती आली होती. परत जाताना सहज विषय निघाला आणि मी पण त्यांच्याबरोबर जायचं ठरलं . आईने परवानगी दिली , एका आठवड्याची . खूप खुश झाले मी . मुंबैबार्हेर राहणाऱ्या सगळ्यांसाठी ठाणे आणि उपनगरं वगैरे सगळ मुंबई मधेच येतं . त्यामुळे आपण मुंबई ला जाणार याचाच आनंद खूप झाला मला. नाना , मावशीचे मिस्टर आम्हाला घ्यायला आले होते , ते रेल्वे मध्ये होते त्यामुळे तिकीटाची फारशी गडबड नं होता नाना ,मावशी , स्वाती आणि मी आम्ही निघालो . पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास आणि तो पण रेल्वे ने म्हणून खूप उत्साहात होते मी . बाबांबरोबर प्रत्येक सुट्टीत बेळगावला जरी जात असले तरी सगळ प्रवास लाल डब्याने व्हायचा, त्यामुळे रेल्वे च आकर्षण खूप होतं .
मावशी बदलापूर ला राहत असल्यामुळे आम्ही कल्याण ला उतरून बदलापूर ची लोकल पकडली . माझ्यासाठी सगळाच नवीन , त्यामुळं आधी काही कळलंच नाही .
आम्हाला सवय , कोल्हापूर ला बस ने उतरलं कि सरळ रिक्षा करायची आणि १५ मिनिटांत घरी . पण इथे परत दुसरी गाडी पकडायची म्हणजे सगळचं वेगळं . शेवटी बदलापूर स्टेशन ला रिक्षा पकडून आम्ही घरी आलो . आणि सगळ्यात आधी जाणवला तो इथला उन्हाळा . एवढा उन्हाळा या आधी मी कधी बघितलाच नव्हता आणि लोकांच फलट मध्ये रहाणं पण . कोल्हापूर मध्ये तेव्हा फळात संस्कृती रुळली नव्हती अजून.
असो , एवढ्या उकाड्याची सवय नसल्यामुळे माझी अगदी तगमग व्हायची मगं मी आणि माझ्या बहिणीने एक उपाय शोधून काढला . आम्ही बाथरूम मध्ये पाणी भरायचो . पाणी जिथून बाहेर जायचं तिथे कपड्याचे गोळे कोंबून ठेवायचे आणि त्या पाण्यामध्ये मस्ती करत राहायचो . अगदी १-२ दिवसच केला असेल असा , कारण , तिसर्या दिवशी खालच्या मजल्यावरच्या फळात चे मालक आले आणि त्यांनी मावशी कडे तक्रार केली कि त्यांच्या बाथरूम मध्ये पाणी गळत आहे , मगं काय , मावशी बरीच ओरडली आणि आमचं खेळण बंद झालं . मग आम्ही संध्याकाळी सायकल चालवायला जाऊ लागलो . मावशी २ रु. द्यायची . त्यावेळी भाड्याने १रु मध्ये अर्धा का एक तास मिळायची सायकल. १-२ दिवस सायकल चालवली मग स्वाती म्हणाली आपण पाणीपुरी खाऊया . मी म्हटलं मावशी ओरडेल ना गं . तर ती म्हणाली आपण सांगायलाच नको . मग काय , आम्ही ते २ रु घेवुन पाणीपुरी खाल्ली . पण रात्री जेवण जाईना . मावशीला वाटल पोटाच काहीतरी बिघडलं असेल . दुसर्या दिवशी परत तेच . माग मात्र मावशीला संशय आला . तिने रात्री विचारलं तसा मी सत्याचा अवतार असल्यामुळे मावशीला सांगून टाकलं आणि मग मावशी स्वातीला जे ओरडली , कि ज्याच नाव ते. झालं , स्वाती खूप चिडली माझ्यावर , बोललीच नाही मग माझ्याशी . मला कळेना आपलं काय चुकलं ते ? खरंतर माझा परत यायचा दिवस जवळ येत चालला होता आणि नानांनी एक दिवस सांगितलं कि आपण उद्या मुंबई बघायला जाणार आहोत. मी खूप खुश झाले , काय काय सांगितलं त्यांनी समुद्र , गेट वे ऑफ इंडिया , म्हातारीचा बूट , मत्स्यालय वगैरे , वगैरे .
दुसर्या दिवशी लवकर उठून मावशीने जेवण तयार करून बरोबर घेतलं आणि आम्ही सगळे बदलापूर स्टेशन कडे निघालो . व्ही टी च्या लोकल मध्ये मावशीबरोबर मी आणि स्वाती चढलो . रविवार चा दिवस असल्यामुळे ट्रेन ला गर्दी कमी होती. आम्हाला बसायला जागा मिळाली . मी तिसर्या जागी बसले होते . जसा आम्ही दादर ला पोहीचालो तशी डब्यातली गर्दी वाढली , मावशी माझ्या समोरच्या बाकावर बसली होती . तीच लक्ष होता माझ्याकडे . माझ्या शेजारी एक बाई येवून बसली आणि मला आत मध्ये ढकलायला लागली मला अगदी नकोस होवून गेलं . मी मावशीकडे बघितलं तर ती ने डोळ्यानीच सांगितलं कि तू हळूच ढकल तिला . मग काय, मी पण हातच कोपर रुतवलं त्या बाईच्या हातामध्ये . तिला बहुतेक ते लागल असाव , तशी उठून मोथाने बडबडायला लागली , कशी लोक असतात बघा , हि बाई (मावशीकडे बोट दाखवून ) या मुलीला सांगते ढकल तिला , बैस बाई बैस . ती बाई बराच वेळ बडबड करत राहिली . मला जाम भीती वाटत होती . मी मावशीकडे हळूच बघितलं तर मावशीने लक्षच नाहीये असा दाखवलं माग मी पण दुर्लक्ष केलं . गाडी पुढे धावतचं होती. आणि मावशीने खिडकीजवळ बोलावून समोर बोट दाखवून सांगितलं , बघ, आपण आता मुंबई मध्ये आलो , उतरायचं आहे आता . आणि मला अजूनही आठवतात त्या स्टेशन च्या बाहेर असणाऱ्या चाळी . माझ्यासाठी मुंबई ची तीच पहिली ओळख ठरली . अजूनही त्या माझ्या डोळ्यासमोर तशाच दिसतात .
माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती . आम्ही व्ही .टी . ला उतरलो . नानांनी विचारलं आपण आता साध्या बस ने जायचं कि डबल डेकर ने ? "डबल डेकर " मी आणि स्वाती एका सुरात ओरडलो . मग आम्ही डबल डेकर च्या वरच्या मजल्यावर बसून जाताना रस्त्यावरची लोकं आणि दुकान सगळ छोट वाटत होतं. आजूबाजूच्या त्या इमारती मी अगदी डोळे मोठे करून बघत होते . आपण कुठेतरी दुसर्या देशात आलो आहोत असा वाटत होता मला. आणि आम्ही गेट वे ला पोहोचलो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा समुद्र बघितला मी . डोळे विस्फारून बघतच राहिले . एवढ अफाट पाणी ! आणि अगदी निळाशार नसाल तरी निळसर पाणी . मला त्याच्या प्रेमात पडायला वेळ लागला नाही. नानांनी सांगितलं आपण इथे जेट्टी ने फिरून येवू. मला काहीच कळलं नाही . पण जेव्हा आम्ही बोटीत बसायला लागलो तेव्हा कळलं जेट्टी म्हणजे बोट. आणि आपल्याला बोट लागते हे पण .
तिथून आम्ही गिरगाव चौपाटी वर गेलो. आणि खऱ्या अर्थाने मी समुद्र बघितला . मी आणि स्वाती समुद्राच्या पाण्यामध्ये बराच वेळ खेळत राहिलो . खूप मज्जा आली . ते खारं पाणी तोंडात पण गेलं आणि पाण्याची चव कळली . माझ्यासाठी हे सगळ स्वप्नवत होतं . आपण कधी समुद्र बघू असा मला वाटल पण नव्हतं . तिथून मग तारापोरवाला मत्सालय बघायला गेलो , एवढे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मी पहिल्यांदाच बघितले . हरकून गेले अगदी . तिथून आम्ही टक्सी ने निघालो . पहिल्यांदा मी टक्सी मध्ये बसत होते . जाताना आजूबाजूच्या इमारती खूप उंच उंच वाटत होत्या . कायम वाडे आणि बसकी घर पाहणाऱ्या मला त्या इमारती म्हणजे काहीतरी वेगळंच वाटत होतं. आणि आम्ही म्हातारीच्या बूटापाशी पोहोचलो , मला तो बूट इतका आवडला कि काही बोलायची सोय नाही. पण आधी जेवू आणि मग खेळ असा नानांनी सांगितलं . म्हणून मग आधी जेवलो . म्हातारीच्या बुटावर चढताना मज्जा आली. बराच वेळ खेळत राहिलो आम्ही. नानांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग आम्ही परत यायला निघालो . खरतर बरीच दमले होते . परत येताना मी आणि स्वाती मावशीच्या मांडीवर डोक ठेवून झोपून गेलो . आणि दोनच दिवसांनी मी आणि मावशी कोल्हापूर ला परत आलो. परत आल्यावर मात्र तिथल्या सगळया गोष्टी सांगून आई च खूप डोकं खाल्लं होतं मी .
माझ्या आठवणीत मुंबई कायम हि अशीच राहिली .
तुमच्या लिखाणात साक्षात् प्रसंग शब्दांत सहजपणे ऊभे करण्याची किमया आहे...मुबई-बदलापूचे मस्ती की पाठशाला खुपच मस्त....बदलापूरचा ऊन्हाळा सुसह्य करण्याचे उपक्रम ...म्हणजे कोल्हापूर ते बदलापूर खोड्या भाग दोन....
ReplyDelete