Saturday, 17 September 2011

प्रत्येकालाच काही न काही अपेक्षा असते, मग ती आई-वडलांकडून असेल किंवा मित्र परिवाराकडून. खूप वेळा असा वाटत अरे का लोक इतकी अपेक्षा करतात? का समोरच्या माणसाला माणूस म्हणून accept नाही करत? एकदा फक्त समोरच्या माणसाला माणूस म्हणून बघा मग जाणवेल...आणि जेव्हा त्याला माणूस मानाल तेव्हा मनापासून मना. जाती, लिंग, वय यापलीकडे जाऊन माना...मग बघा . तुमच तुम्हाला जाणवेल खरच आपल्याला किती हक्क आहे इतकी अपेक्षा करण्याचा? का आपण एखाद्याला माणूस म्हणून जगायला देत नाही? का अपेक्षांचं ओझं लादतो?
मग कुणाकडून अपेक्षा करायच्याच नाहीत का? नाही कोण म्हणत? पण लादू नका. कारण लादल्या गेलेल्या अपेक्षा liability ठरतात . अपेक्षा एवढीच असावी कि पुढचा माणूस प्रगती करू शकेल...आणि ती पण positively असा नको व्हायला कि अवास्तव अपेक्षांमुळे त्याची वाढ खुंटेल आणि तो अशा परिस्थितीत अडकेल कि कुणीच मदत नाही करू शकणार...
प्रत्येकानंच हे तारतम्य बाळगलं तर कितीतरी जण सुखी होतील....



No comments:

Post a Comment