Tuesday, 7 May 2013

दुपार

Kया भयानक उकाड्यात, एसीच्या थंड हवेत बसलेली असताना, कधीतरी मनामधे उगवते ती शाळेत असतानाची दुपार. 
स्वाभाविक आहे की दुपार , उन्हाच्या त्रासामुळे खुप लोकंाना आवडत नाही. पण मला आवडते. कारण माझ्या लहानपणी ती दुपार पण छान वाटायची.
शनिवारी शाळा सकाळची असायची. आईच्या नोकरीमुळे घरी मी आणि केदार, आम्ही दोघेच असायचो, त्यात सुध्दाजेवण झाल की हा गुडुप व्हायचा.
आमचं घर दोन भागात विभागलेलं होतं. एका बाजुला स्वयंपाकघर आणी एक खोली आणी दुसर् या बाजुला सोपा ( बाबांच्या भाषेत) आणी देवघर. मधेअंगण होतं. अंगणात लावलेला पिवळ्या फुलांचा वेल सोपा आणी त्या समोरच्या खोलीवरच्या छपरावर पसरला होता. हिरवागार एकदम. दुपारच्या वेळी माझ्यासारखाच सुस्तावला आहे अस वाटणारा. त्यावर अधुनमधुन येणार् या चिमण्या (कधी कधी खुप गप्पा मारणार् या). खोलीमधुन पलंगावर पडुन बाहेर वेलींमधुन येणारे उन्हाचे कवडसे बघण्यात खुप वेळ जायचा माझा. आणी आपणहीत्याच शांततेचा एक भाग आहोत असं वाटायच.
अजुनही वाटतं, फक्त एकदाचं, ते जुनं घरं, त्या वेली , ते कवडसें, त्या चिमण्यांच्या गप्पा आणी घरात आणी माझ्या मनात भरुन राहिलेली शांतता अनुभवा़ला मिळावी. 

Sunday, 7 April 2013

Meer Taqi Meer 2

Hasti apani hubab ki si hai
Yah numaish surab ki si hai

Najuki usake lab ki kya kahiye
Pankhadi iak gulab ki si hai

Bar-bar usake dar pe jata hun
Halat ab ijtarab ki si hai

Main jo bola , kaha ki yah awaz
Usi khana- kharab si hai

'Meer' un neem-baaz aankho main
Sari masti sharab ki si hai

Saturday, 6 April 2013

Meer Taqi Meer

Meha ki tuzase tavakko thi, sitamgar nikala
Mom samaze tere dil ko so pathar nikala

Jite ji, aah, tere kuche se koi na fira
Jo sitam-dida raha jaake so mar kar nikala

Dil ki aabadi ki is had hai kharavi ki na puchh
Jana jata hai ki is raah se lashkar nikala

Meanings
Meher- krupa
Tavakko-asha
Sitamgar- anyayi
Sitam-dida- sukhi

Tuesday, 28 August 2012

पुणे - मुंबई व्हाया NH ४

पुणे - मुंबई व्हाया NH ४

खूप दिवसापसुनची इच्छा होती कि, आपण एकदा तरी पुणे-मुंबई हा प्रवास NH ४ ने करावा . शेवटी मागच्या रविवारी आम्ही पुणे मुंबई हा प्रवास NH ४ ने केला . आणि खर सांगू का? मला तो highway इतका आवडला आहे कि काय सांगाव!
आजपर्यंत प्रवास केल तो फक्त EXPRESSWAY  वरून, पण expressway कधी आपला वाटलाच नाही। कधी आतमध्ये जाऊन भिडलाच नाही . तो मनाला भावतो फक्त पावसाळ्यात , एरवी मला तो कधीच आवडला नाही .पण NH ४ तसा नाही, तो छोट्या छोट्या गावांनी वेढलेला आहे . अधे मध्ये दिसणारी लोकं , गाड्या, घरं , शेतं सगळ करा मोहवणारं . आणि अधून मधून येणारी पावसाची झड ...अहाहा !!
NH ४ वरून प्रवास केला आणि वाटल कि expressway एखाद्या sophisticated घरातला असावा ...सगळ जिथल्या तिथे ...आणि NH ४, एखाद्या अघळपघळ घरातला, दोन्ही हात पासून स्वागत करणारा ...त्यातून खंड्याळ्याला त्याच सौंदर्य काय वर्ताव ....
आता कधीच Expressway वरून जायची इच्छा नाही ..:)

Friday, 20 July 2012

आज श्रावाणातला पहिला शुक्रवार.....आठवण करून देणारा लहानपणची . माहिती नाही पण सकाळपासूनच सगळ आठवायला लागल. कोल्हापुरातले ते दिवस कधीही परत न येणारे...
साधारण सात  - आठ वर्षाची असताना आम्ही ज्यांच्याकडे भाड्याने राहायचो त्यांच्याकडे सकाळी प्रसादाच निमंत्रण असायचं. कुमारिका म्हणून मी  सवाष्ण म्हणून आई. मी आणि आई साधारण सकाळी 9.30-9.45 वाजता त्यांच्याकडे  जेवायला जायचो . पावसामुळे हवेत गारवा असायचा....
त्यांच्या माजघरात आमची पान मांडलेली असायची...बाजूलाच देवघर होत त्याचंसुरेख . सुरेख पूजा केलेली असायची अंबाबाई ची . सवाष्ण जेवन्णार असल्यामुळे जेवण साग्रसंगीत असायचं. माझ्यासाठी रु1 दक्षिणा असायची आणि त्यावेळी  रु1 सुद्धा खूप जास्त होता.
अजूनही त्यांच्या माजघरातला वास आठवतो मला...गरम गरम जेवणाचा ...वरण-भाताचा-पुरणपोळ्यांचा , देवासमोर लावलील्या उदबत्तीचा, देवीला घातलेल्या हारांचा...
सगळ आठवलं आणि आजची सकाळ एकदम प्रसन्न होऊन गेली...