आज श्रावाणातला पहिला शुक्रवार.....आठवण करून देणारा लहानपणची . माहिती नाही पण सकाळपासूनच सगळ आठवायला लागल. कोल्हापुरातले ते दिवस कधीही परत न येणारे...
साधारण सात - आठ वर्षाची असताना आम्ही ज्यांच्याकडे भाड्याने राहायचो त्यांच्याकडे सकाळी प्रसादाच निमंत्रण असायचं. कुमारिका म्हणून मी सवाष्ण म्हणून आई. मी आणि आई साधारण सकाळी 9.30-9.45 वाजता त्यांच्याकडे जेवायला जायचो . पावसामुळे हवेत गारवा असायचा....
त्यांच्या माजघरात आमची पान मांडलेली असायची...बाजूलाच देवघर होत त्याचंसुरेख . सुरेख पूजा केलेली असायची अंबाबाई ची . सवाष्ण जेवन्णार असल्यामुळे जेवण साग्रसंगीत असायचं. माझ्यासाठी रु1 दक्षिणा असायची आणि त्यावेळी रु1 सुद्धा खूप जास्त होता.
अजूनही त्यांच्या माजघरातला वास आठवतो मला...गरम गरम जेवणाचा ...वरण-भाताचा-पुरणपोळ्यांचा , देवासमोर लावलील्या उदबत्तीचा, देवीला घातलेल्या हारांचा...
सगळ आठवलं आणि आजची सकाळ एकदम प्रसन्न होऊन गेली...

good far chhan lihale ahes Shravan mahina ani vgvegale san mahina kasa jato kalat nahi
ReplyDelete