एखादं काम पूर्ण झाल्यावर येणारं रिकामपण , मनाला व्यापून टाकतं. जस नवीन येणारं काम व्यापातं तसं . पण नवीन कामामध्ये ते पूर्ण करण्याची झिंग असते तशी मनाच्या रिकामपणात नसते, असतो तो भकासपणा, उदासी . खूप भीती वाटते मला मनाच्या या रिकामपणाची. काहीतरी हरवतं आहे असा वाटत राहतं, आणि नक्की काय होत आहे ते काळत नाही. मग बेचैन व्हायला होतं , जगण अवघड आहे असा वाटायला लागतं. मी तुझ्याकडे यायचा प्रयत्न करते , पण तू पण हरवून गेलेला असतोस . आजूबाजूला दाट धुक असतं , वाट सापडत नाही.. डोळ्यापुढे फक्त अंधार असतो , पुढे काय कराव ते उमगत नाही . यातून बाहेर पडणार हे माहिती असत, पण बाहेर येण्यासाठी हातात काहीतरी काम याव लागतं, मन त्यामध्ये गुंताव लागतं . तसा झाल, तरच परत एकदा जगायची उमेद वाढते , जग परत एकदा सुंदर होत आणि मनामध्ये मला तू पण सापडतोस .
पण हे सगळ खूप पुढचं आहे. आत्ता मन रिकाम आहे, काहीतरी शोधतं आहे , हात रिकामे असल्याची भावना जास्त तीव्र आहे . पूर्ण झालेल्या कामाच्या समाधानापेक्षा आताच रिकामपण भयानक आहे . काम पूर्ण झाल्याच समाधान १-२ दिवस टिकतं , पण नंतर येणारी पोकळी खायला उठते . खूप एकटं एकटं वाटत राहतं. सगळे भोवती असून पण एकटेपण जात नाही . हे एकटेपण नको वाटत . तू तरी बरोबर रहावस अस वाटत राहत …. मी शोधते तुला , तुझा हात पकडायचा प्रयत्न करते, पण तू पण सुट्टी घेतल्यासारखा निघून गेलेला असतोस . तू असशील तर मग माझ मन रिकाम होणारच नाही हे माहिती असल्यासारखा.
आता वाट बघतेय तुझी , तू आलास कि एकटं वाटणार नाही , सगळ भरून जाइल. मला माहिती आहे, तू येशील तेव्हा काहीतरी नवीन काम सोबत आणशिलचं , मग परत नवीन काहीतरी सुरु होईल … नवीन काम , नवीन झिंग आणि परत त्यात बुडणं होईलंच.

रिकाम मन...म्हणजे एका कलासक्त मनाच अस्वस्थता अचूक शब्दांत मांडण्यात आपण नक्कीच यशस्वी झाल्या आहात....आपली आतमसंवेदना जाणून तो व्यक्त करताना आपला पारदर्शक मांडणी स्तुत्य आहे....मनाची वेदना जाणून त्यावर मार्ग काढला पाहीजे....
ReplyDelete