स्वप्नं तुझी माझी , इथे असलेल्या प्रत्येकाची
काही छोटी छोटी, तर काही मोठी मोठी
काही एकमेंकात मिसळणारी, तर काही स्वतंत्र अस्तित्व असणारी
काही मागच्या पानावरून सुरु होणारी , तर काही रोज नवीन पान उघडणारी
काही चाफ्याच्या सुगंधाने न्हायलेली , तर काही रातराणीच्या वासाने धुंदावलेली
काही रोजच्या जगण्यातली , तर काही उद्याची
काही साधी सरळ , तर काही गुंतागुंतीची
काही मनातून आलेली , तर काही पूर्णपणे अनोळखी
काही भूतांची, तर काही देवांची
काही नवीन घरांची , तर काही जुन्या घरातल्या आठवणींची
काही खोल काळोखातून आलेली, तर काही दिवसाच्या उजेडातली
काही पहाटेच्या प्रजाक्तांच्या फुलांची, तर काही संध्याकाळच्या दिव्यांची
काही रेंगाळणारी , तर काही पटकन संपणारी
काही लक्षात राहणारी , तर काही पटकन विसरली जाणारी
काही ठसा उमटवणारी , तर काही आठवावी लागणारी
काही मन प्रसन्न करणारी , तर काही उदास करणारी
काही मन हळवं करणारी , तर काही राग आणणारी
काही कल्पना देणारी, तर काही चटके देणारी
काही वास्तवतेच्या निखार्यांवर भाजलेली , तर काही पर्यांच्या राज्यात पोहोचलेली
काही मन मोहरून टाकणारी , तर काही जखमेवर मीठ चोळणारी
काही भरारी घेणारी तर काही पंख तुटलेली , असहाय्य
स्वप्नं तुझी माझी , इथे असलेल्या प्रत्येकाची , प्रत्येकाच्या जगण्याचा भाग असलेली , कल्पनांना बळ देणारी, कधी जगण्याचा अर्थ उलगडणारी , तर कधी प्रत्यक्षात उतरणारी
स्वप्नं तुझी माझी, कधी एकत्र होणारी तर कधी वेगवेगळया वाटांवर जाणारी
स्वप्नं तुझी माझी, नवीन विश्व निर्माण करणारी , जगण्याचा बंध घट्ट करणारी.
याच स्वप्नांना नाव पण वेगवेगळी आहेत , कुणी त्याला ध्येय म्हणत तर कुणी पुढचा विचार , माझ्यासाठी मात्र ते पण स्वप्नच असतं .

छानच :)
ReplyDeleteतव लेखणीस फुटली पालवी I
तव मनाचा क्षीण घालवी II
स्वप्नालाही स्वप्नात वाटले नसेल की स्वप्नात असताना त्या स्वप्नाला असं सुंदर स्वप्न वाटणारा लेख स्वप्नात वाचायला मिळेल. ;-)
ReplyDeleteस्वप्नांच्या अनोख्या दुनियेची मनमोहक सफर...अप्रतिम
ReplyDelete