Wednesday, 12 November 2014

शुन्य

मोबाईल चा एक चौकोन
मनावर आणि भावनांवर राज्य गाजवणारा
मनाला मोहात पाडणारा
मनाच्या अस्वस्थतेच्या कारणांपैकी एक
एका खोटारड्या जगाचं दार
कुणी कुणाच नाही , पण सगळे बांधले गेलेले
बहुतेक सगळा दिखाऊपणा
काय उरतं हातातं ? एक भलं मोठ शुन्य
स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न घेवून उभं असलेलं शुन्य
मला या शून्यात अडकल्यासारखं वाटतंय
काहीच घडत नसताना पण बरंच घडतंय
पण जे घडतंय ते त्रासदायक होत
विचार , विचार आणि नुसते विचार
ज्यातुन हातात येत शुन्य
याच शून्यातून सगळ उभ करायची रग कुठ गेली?
हेच शुन्य त्रासदायक होतंय आता
हे शुन्य नको , हे अस्तित्व नको
आपण आपल्याला नकोसे होतो तेव्हा काय होतं ?


2 comments:

  1. शून्यांकित झालेल्या आयुष्याला वलयांकित कस करायच ते शेवटी आपल्याच हातात असत...नाही का?

    ReplyDelete
  2. मोबाइल मुळे निर्माण झालेली अगतिकता.....सध्या तंञज्ञानाच्या संवादाने निर्माण झालेली संवादहिनता....काहींनी सोयीस्कर रीत्या chatting ला बोलण अशी संज्ञा दिलीय.

    ReplyDelete