रोजच्या रुटीन चा कंटाळा यायला लागला कि मन निसर्गाकडं ओढलं जातं . त्याला ताजतवानं होण्यासाठी निसर्गाची तहान लागते. मी पण खूप कंटाळले होते . ऑफिस ते घर , घर ते ऑफिस करून , सुट्टीच्या दिवशी माॅलला फेरफटका मारून मारून . काहीतरी छानस करावंसं वाटत होतं . पण काय कराव हे काही सुचंत नव्हंत . उपेंद्र म्हणाला, तुला एका छानशा जागी घेवून जातो यावेळी . म्हणून त्याने थळ ला बुकिंग केलं . नुसतच मोघम सांगितलं थळ बद्दल, अलिबाग जवळ आहे म्हणून . नेट वरती माहिती बघितली तर तिथून जवळ एक लाईट हाऊस आहे असं कळलं . जातानाच प्लान केला लाईट हाऊस बघायचच म्हणुन. दोन दिवसाचा बेत ठरला .
सकाळी लवकर उठून आम्ही अलिबाग च्या रस्त्याला लागलो . कर्नाळा बर्ड सेन्चुरीच्या इथून जाताना , प्रत्येकवेळी वाटतं इथे आलं पाहिजे, यावेळी पण परत एकदा ठरवलं कि इथे येवू आपण . जाताना "जैत रे जैत "मधला सुळका लागला . आणि मनात गाणं घुमायला लागलं , 'लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला '. मन प्रसन्न झालं . आजुबाजुच्या झाडांमधून उगवणारा सुर्य बघायची मजा काही वेगळीच असते .
निसर्गाची पण नशा असते एक . बेभान व्हायला होतं . मनाच पाखरू होतं आणि भटकत राहतं, झाडांवरून , पानांवरून , फुलांवरून . बघता बघता आम्ही थळ ला पोहोचलो . थोडे चुकून , पुढे मागे जात शेवटी इच्छित स्थळी पोहोचलो आणि लक्षात आलं कि किहीम बीच अगदी जवळ आहे , जास्तीत जास्त १० मिनिटांवर .

जिथे उतरलो होतो तिथून जवळच एक सुंदर तलाव होता . सकाळच्या वेळी फुललेली कमळं , तिथे असणारे बगळे , आजुबाजूच थंड आणि शांत वातावरण. असं वाटतच नव्हंत कि आपण मुंबईच्या जवळ आहोत . एक वेगळंच जग , एक वेगळाच अनुभव.

फ्रेश झालो आणि तिथल्या स्वागतिकेला जवळपास बघायला काय काय आहे विचारलं . तसं तिने मांडवा बीच , करमरकर शिल्प संग्रहालय, किहीम बीच सांगितला . इथून लाईट हाऊस किती लांब आहे विचारलं तर म्हणाली , 'तसा ब-यापैकी लांब आहे , पण गाडी जाते तिथं पर्यंत '.
आम्ही सगळ्यात आधी किहीम बीच ला जायचं ठरवलं , शर्वरी ला पाण्यात खेळायचं होतं . अर्थात मला पण . दुपारी मांडवा आणि मग करमरकर संग्रहालय .
किहीम बीच वरती पोहोचल्यावर गर्दी अगदीच कमी आहे हे जाणवलं . तसं उपेन्द्राला वाटलं आपण काशीद बीच ला जाऊ . काशीद बीच पण जवळ आहे तिथून साधारण २०किमी वगैरे असेल . पण मला मात्र वाटलं कि आपण इथेच थांबू . काशीद ला गर्दी खूप असते , त्यापेक्षा हा शांत आहे . हो नाही करता करता शेवटी आम्ही किहीम लाच थांबायचं ठरवलं .

मी आणि शर्वरी लगेच पाण्यात शिरलो . लाटांबरोबर खेळण्याची मजा काही औरच असते . वेळेच भान निघून जातं. समोर पसरलेला अफाट समुद्र ,नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी आणि त्याला टेकलेलं आभाळ . यावर असणारे ठिपके म्हणजे आपण . समोरून येणाऱ्या लाटा अंगावर झेलत आम्ही कमरेएवढ्या पाण्यात उभे होतो . मोठ्या लाटेबरोबर मागे ढकललो जायचो आणि परत पुढे यायचो . थोडे मागे होवून येणाऱ्या लाटांवर उड्या मारण्याची मजा शब्दात सांगतां येणं अवघड . एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचा खेळ खेळताना परत एकदा लहान झाल्यासारखं वाटलं .
खूप वेळ खेळलो आम्ही . शेवटी साधारण १ वाजता भूक लागल्यावर बाहेर आलो . मी ताडीची फळं आणि शर्वरी ने शहाळं घेतलं . मग सावकाश आम्ही परत आलो . इतके थकलो होतो कि जेवण करून मस्त ताणून दिली . ४ वाजता कशीबशी जाग आली . थंडीचे दिवस असल्याने आणि तसा प्रदेश अनोळखी असल्याने मांडव्याला लवकर जायचं ठरवलं होतं . त्याप्रमाणे ५-५.१५ ला बाहेर पडलो .

मांडवा , अग्निपथ मधून भेटलेला . तस्करांसाठी सोयीच ठिकाण म्हणून माहिती असलेला . खूप उत्सुकता होती , मांडवा बघायची . जसे आम्ही मांडव्याजवळ पोहोचलो तसं डोळ्याचे पारणे फेडतील असे बंगले दिसायला लागले .झाडांमधून लपलेले , भले मोठे असे . बघता बघता आम्ही मांडवा जेट्टी जवळ पोहोचलो .
लोकांची ही गर्दी . तिथून गेट वे ला जायला . हा मुंबईला पोहोचायचा सगळ्यात जवळचा मार्ग . सकाळी ८. १५ पासून बोट आहे गेट वे साठी . तासा दीड तासात मुंबई .

मांडव्याच्या किनार्यावरून मुंबईचे दिवे दिसतात . आम्ही बराच वेळ थांबलो , येणा-या आणि जाणा-या लोकांची गर्दी बघत .

मांडव्याच्या किना-यावरुन गेल (GAIL ) चे दिवे लांबून एखाद्या अनिमेटेड सिनेमा मधील स्वप्नांच्या शहरासारखे दिसतात .
बराच अंधार झाल्यावर आम्ही तेथुन निघालो . आता करमरकर संग्रहालय शोधायचं होतं. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळेजण मदत करायला अगदी तयार. " इथून सरळ जावा , पुढे राईट घ्या , आणि मग थोडे पुढे जाउन लेफ्ट घ्या ". इतक्या सूचना असून पण रस्ता चुकायचा तसा चुकतोच . शेवटी विचारत विचारत एका वळणावर पोहोचलो . इथून आम्हाला राईट घ्यायचा होता . आम्ही वळलो तसा सगळा रस्ता अंधारात बुडालेला होता . काय करावं कळेना , म्हणून जवळ असलेल्या काकांना विचारलं . तर ते म्हणाले ," मी इथून जवळचं ६ मैलांवर राहतो . तुम्ही मला तिथे सोडा आणि मग तसेच डावीकडे सरळ जा , सासवण्यात पोहोचाल ".
आम्हाला दुसरा काही पर्यायच नव्हता . काका गाडीत बसले आणि मग गप्पा सुरु झाल्या . तेवढ्यात समोरून एक भली मोठी कार पास झाली . तसे काका म्हणाले ," आमचं गाव आता ५star झालं आहे. " आणि मग बोलण्याच्या नादात कळलं कि त्यांची १०० एकर जमीन आहे . त्यांच्या एका बाजूला सचिन तेंडूलकरने जमीन घेतली आहे आणि जवळच जुही चावला ने पण .
आम्ही एका तळ्यावरून थोडे पुढे आलो आणि कळलं कि त्या तळ्याच्या पलीकडे संजय मांजरेकर चा बंगला आहे आणि त्याने आपल्या आईच्या नावाने तळ्याभोवती बाक ठेवले आहेत . रस्त्यावर अजीबात लाईट नव्हते त्यामुळे आजूबाजूचा अंदाज फारसा येत नव्हता .आम्हाला आलेला टेन्शन बघून काका थोडा पुढपर्यंत आले आणि मग सरळ जावा सांगून निघून गेले . आम्ही तसेच पुढे आलो , आणि शेवटी सासवणेला पोहोचलो . तिथे करमरकर संग्रहालय सगळ्यांना माहिती आहे .
जशा पाय-या चढून गेलो तशा सुनंदा करमरकर ( शिल्पकारांची सून ) आम्हाला खुर्चीत बसलेल्या दिसल्या .

त्यांनी लगेच आत या म्हटलं आणि शेजारच्या दिवाणाकडे बोट दाखवून बसायला सांगितलं . त्यांना बोलायची खूप हौस आहे . आणि विषय पण भरपूर आहेत . बोलायच्या ओघात त्यांनी बराच काही सांगितलं . त्या एकट्या तिथे राहतात . मदतीला एक आज्जी आहेत आणि एक त्यांनी सांभाळलेला मुलगा आहे . घरातली शिस्त लष्करी आहे . शिल्पकारांचा मुलगा लष्करात होता. अतिशय व्यवस्थित आहे घर त्याचं. त्या खाली रहातात आणि वरती संग्रहालय आहे .
सुनंदाताई , वय वर्षे ८० . गेली २१ वर्षे एकट्या राहतात तिथे , त्यांचा मुलगा , सुन आणि दोन्ही नाती अमेरिकेत असतात . दर सहा महिन्यांनी मुलगा किंवा सुन चक्कर मारतात . या पण कधी कधी तिकडे जातात . त्या ठणठणीत आहेत , स्वयंपाक वगैरे करतात अजून .त्यांच्याकडे १९६० मधला ओवन आहे आणि अजूनही आम्ही त्यात बिस्कीट वगैरे करतो म्हणाल्यावर मी थक्क झाले . प्रचंड उत्साही आहेत त्या . त्यांना बघितल्यावर मला त्या खूप आवडल्या . तरुणपणी दिसायला त्या नक्की सुरेख असतील हे पण जाणवलं. कलकत्त्याला रहात असताना त्यांनी मदर तेरेसां बरोबर काम केलं आहे.

आम्ही संग्रहालय बघायला गेलो . शिल्पं अतिशयं सुरेख आहेत . खूप बारकाईने केलेलं काम जाणवत . सुनंदाताई म्हणाल्या तसं शिल्पकारांचं नुसतं डोळ्यांच काम बघून पण थक्क व्हायला होतं .

आपल्याला डोळ्यांमधला फरक जाणवायला लागतो . कुणाचे डोळे काळे असतील , तर कुणाचे निळे, हा फरक स्पष्ट जाणवतो . चेह-यांवरचे भाव तर अप्रतिमच !

त्यांनी केलेलं एक शिल्प आहे , हिरा कोळीणीच . साधारण १५-१६ वर्षांच्या त्या मुलीचं शिल्प इतकं अप्रतिम आहे , कि ते तिथे जाऊनचं पहावं.

स्वत:च्या मुलीचं ती ४ आठवड्याची असताना केलेला चेहरा , नंतर वेगवेगळ्या वयातली शिल्पं तर परीसस्पर्श जाणावूनच देतात. शिवरायांचा पुतळा तर निव्वळ अप्रतिम .

गांधीजींच स्वतः समोर बसून केलेलं शिल्प , रबिन्द्रनाथ टागोरांच आधुनिक प्रकारातलं शिल्प, अशी तिथे ठेवलेली सगळी शिल्पं डोळ्याचं पारणं फेडतात. धन्य तो शिल्पकार ! आजच्या दिवसातला , हे संग्रहालय म्हणजे कळस ठरलं .
अतिशय छान वाटत होतं आम्हाला परत येताना .

दुसरा दिवस उजाडला तोच पक्ष्यांच्या किलबिलाटाने .

आता वेळ होती लाईट हाऊस ची . आम्ही नेहमीप्रमाणं विचारत विचारत निघालो . तर ते अलिबागच्या थोडं पुढं असल्याचं कळंल . आम्हाला वाटलं रेवदांड्याला आहे . म्हणून तिथपर्यंत गेलो तर कळंल कि ते अजून थोडं पुढे मुरुड - जंजिरा च्या वाटेवर आहे . गावाच नाव आहे "कोर्लाई" . गाव अगदी छोटं आहे . रस्ते जेमतेम एक गाडी जाईल असे . गावाच्या टोकाला , डोंगरावरती लाईट हाऊस आहे . वाटेवरती मासळी वाळवताना बायका दिसत होत्या .

किनार्याजवळ थोड्या उंचीवर बांधून घेतलेले चौथारे आणि त्यावर वाळंत घातलेली मासळी .

लाईट हाऊस पर्यंत जाण्याची वाट म्हणजे एक कच्चा रस्ता . एका बाजूला डोंगर आणि दुस-या बाजूला समुद्र . त्यातून समोरून जर दुसरी गाडी आली तर दोघांपैकी एकाला मागे जाण्याशिवाय पर्याय नाही .

लाईट हाऊस छोटं आहे . आणि सोलर वरती चालंत . तिथे असणारे लाईट हाऊसमन सगळी माहिती देतात , आणि फी आहे फक्त १०रु. आपण अगदी वरती लाईट जिथे असतो तिथपर्यंत जाऊ शकतो . त्या लाईटच्या दोन मिनटात किती फे-या होतात यावरती तो कोणत्या ठिकाणी आहे हे समुद्रातील जहाजांना कळतं .लाईट हाऊस आणि परिसर अतिशय सुंदर आहे . जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम आहे. या ठिकाणाचं कितीही वर्णन केलं तरी अपुरं आहे .
यावेळी परत निघताना खूप समाधानी वाटत होतं . एक अविस्मरणीय अनुभव होता . परत जाउन सगळं नेहमीप्रमाणे सुरु होणारच होतं , पण निसर्गाच्या सहवासातले हे दोन दिवस कसे गेले ते कळलंच नाही .

वाह छान प्रवासवर्णन.अगदी फिरुन आल्यासारखं वाटल. उत्तम लेख. खुप आवडला.
ReplyDelete