Tuesday, 20 December 2011

एक फसलेली नेशनल पार्क पिकनिक

नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी ठरलं कि आपण उद्या संजय गांधी नेशनल पार्क ला जावूया. मी , शर्वरी (माझी मुलगी) , स्मिता, सास्वती, साई सगळ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता ठाणे स्टेशन ला भेटायचं ठरवलं. मंदारन नेहेमीप्रमाण घोळ केला येण्याचा पण शेवटी त्यान पण पक्कं केल.

सकाळी उठ्ल्यावरच पाल चुकचुकायला लागली. शर्वरीन येणार-नाही येणार चा गोंधळ केला आणि फिनाल्ल्य आम्ही दोघी  ठाणे स्टेशनवर ९.३० वाजता पोहोचले...त्यामध्येच साई चा फोने आला आत्ता उठलोय आणि थोडा उशीर होईल...झाल . त्याला म्हटलं पटपट अवर आणि ये, आम्ही थांबतो. 

मी आणि शर्वरी स्टेशनवर पोहोचेपर्यंत स्मिता येऊन पोहोचली होती...अजून मंदार, सास्वती आणि साई चा पत्ता नव्हता...मग काय कराव म्हणून आम्ही नाष्टा उरकून घेतला...एकदा वाटल सगळ्यांना सांगाव कि पिकनिक कॅन्सिल केली आहे आणि मस्तपैकी घरी जाऊन झोपावं...पण नाही हौस न National park बघायची...:P
शेवटी सगळे १०.१५ पर्यन्त ठाणे स्टेशन च्या जवळच्या ST stand जमलो. ST पण लगेच आली  . "direct
 बोरीवली direct बोरीवली...पोवई मार्गे..ticket जास्त आहे" असा conductor ओरडत असतानाच आम्ही आत शिरलो. कुणीही तसदी घेतली नाही conductor ला विचार्याची कि अरे घोडबंदर रोड सोडून तू पोवई मार्गे का ST काढणार आहेस??....(दुसरा फटका)

बसायला वगैरे छान जागा मिळाली...आणि एक UP कडची बाई आली , हातात एक छोट बाळ आणि हात धरलेली दोन मुल , मग काय बसायला जागा देण आपल कर्तव्यच होत ना...थोडा सरकून जागा करून दिली..गाडी जशी सुरु झाली तशी ती बाई आणि शर्वरी दोघी पण पेंगायला लागल्या..शर्वरी मस्तपैकी झोपून गेली....मांडीवर bag , त्यावर शर्वरी झोपलेली आणि शेजारची बाई पण मस्तपैकी मांडी घालून झोपून गेली. आता आली का पंचाईत ?? तिला काही बोलाव तर लोक म्हणणार बघा एवढस बाळ घेऊन हि बाई कशी उभी राहणार?? मग आलीय भोगासी म्हणून ...गप्प बसले..:(
बरोबर ११.४५ वाजता आम्ही "संजय गांधी नेशनल पार्क" पाशी पोहोचलो...हुश्श झाल मला...चला म्हणून मग आमची वरात तिकीट विंडो पाशी गेली. नशिबान तिथ गर्दी न्हवती. बर वाटल जरा, पण आत गेल्यावर लक्षात आल कि आपल्याला जरा जास्तच उशीर झाला आहे...पण म्हटलं ठीक आहे आलो आहोतच तर आत मध्ये पण एक चक्कर मारून येवू...समोरच सायकल भाड्याने वापरण्यासाठीचा स्टाल (??) होता. शर्वरीचा हट्ट सुरु झाला,"मला सायकल हवीच". म्हटलं ठीक आहे...चालून चालून पाय दुखाण्यापेक्षा हे बर..
मग रु २००/- diposit ठेवून क्य्च्ले घेतली. चला, आता पाय दुखतात म्हणून रडणार तरी नाही हि.
आम्ही थोडे पुढे गेल्यावार एका लेकपाशी आलो. शर्वरीन हट्ट सुरु केला...आपण बोटिंग करू म्हणून. तिला समजावलं कि आपण आधी थोडा बघू आणि माग बोटिंग ला जाऊ...शहाणी ग माझी लेक ..लगेच तयार झाली . तसे आम्ही पुढे निघालो...आता खरच उन खूप जाणवत होत..हुश्श हुश्श करत आमच्या स्वाऱ्या पुढे निघाल्या आणि इतक्यात आम्हाला पाण्यात साप दिसला...

चला म्हटलं पहिला प्राणी तरी दिसला. तसे थोडे पुढे गेल्यावर सिंह आणि वाघाच्या सफरीचे बोर्ड दिसले...मग ठरवलं चाल बघून तरी येवू. आता इतक्या उन्हात तर वाघ - सिंह काही बाहेर येणार नाहीत, निदान काय आहे ते तरी कळेल.  म्हणून टिकेट विंडो पाशी गेलो..तर त्यांनी सांगितलं कि आताच विंडो बंद झाली आहे आणि दोन शिवाय उघडणार नाही.झाल, फक्त ५ मिनिट च उशीर झाला होता, थोडा मस्का मारायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आता काय कराव या विचारात असतानाच शर्वरी म्हणाली चाल आता बोटिंग करू. म्हटलं चाल जाऊ तसे पण १२.३० झाले होतेच . १ तास नक्कीच बोटिंग मध्ये गेला असता. आम्ही परत बोटिंग पाशी आलो .
तिथ पण क़्यु होता. पण टिकेट लगेच मिळाली. जरा बर वाटल. आता बोट मिळण्यासाठी परत रांगेत उभे राहिलो. सरते शेवटी १५ मिनिटात बोट मिळाली. हुश्श झाल. उभं राहून राहून अगदी पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती.
साई, शर्वरी आणि मंदार एकाबाजूला बसले आणि मी, सास्वती आणि स्मिता एका बाजूला बसलो...balance व्हायला हवा ना!



















पण बोटिंगला मजा आली. साईचा तेवढाच ६ महिन्यांचा व्यायाम झाला. हाशहुश करत दोघ pidal मारत होते...आणि आम्ही मस्त enjoy करत होतो. शेवटी मी साई ला म्हटलं , आता मी pidal मारते, तर तो लगेच हो म्हणाला..परत एकदा शहाणपणा अंगाशी आला.
१५ मिनिट बोटिंग केल्यावर आम्ही परत आलो. म्हटलं चला आता सफारीला जाऊ..शर्वरी थोडी कंटाळ्यासारखी  झाली होती . पण वाघ- सिंह दिसतील म्हटल्यावर खूप खुश झाली. "आई आपण पाळूया का ग?". मी म्हटलं," तू थोडी मोठी हो माग पाळू"." जा, तू नेहमी अशीच करतीस ". असा म्हणून गाल फुगाव्ल्यावर तिला म्हटलं," तुला पेरू घ्यायचे का?"...कळी लगेच खुलली...मग आम्ही दोघी आणि सास्वती पेरू घ्यायला निघालो आणि साई रांगेत जाऊन उभं राहिला ...भली मोठी रांग होती आता ..मनात म्हटलं , आता बहुतेक ४ वाजताच टिकेट मिळेल.
सगळ्यांसाठी पेरू घेऊन आम्ही परत आलो तर , रांग थोडीशीच पुढ गेली होती...आणि इतक्यात सफरीच्या बसेस येऊन उभ्या राहिल्या..बापरे, या बसेस?? स्मिता तर म्हणायला लागली," अग , अशा बसेस मधून काय दिसणार??चाल परत जाऊ." तिला म्हटलं," अग, थांबलो आहोतच तर बघूनच जाऊ चल."
शेवटी तिकीट घेऊन साई आला आणि आम्ही बस मध्ये चढलो...बसायला जागा नव्हतीच . मी सगळ्यात शेवटच्या सीट वर आणि माझ्या शेजारी एक foreigner बाई बसली होती. स्मिता आणि सास्वतीला , drivar च्या केबिन मध्ये जागा मिळाली.मस्तपैकी पुढे..
आणि सफारी सुरु झाली..म्हटलं चला आता काहीतरी चांगल बघायला मिळेल. असा मनात विचार येतो ना येतो तोच एक सिंह दिसला. इतका मरतुकडा होता कि काय सांगाव??तो असा झोपला होता कि वाटाव मेलेलाच आहे
पण, इतक्यात त्याच पोट हलताना दिसलं.
आणि आम्ही परत आलो, झाली सिंहाची सफारी(तिथे ३सिन्ह आहेत, त्यापैकी २ जनावरांच्या हॉस्पिटल मध्ये admit आहेत) , आता वाघाची सफारी सुरु झाली...आणि वाघ दिसले ,मस्त होते .

 फोटो काढताना ती foreigner बाई म्हणाली, 'तुझ्या कॅमेऱ्याची लेन्स फक्त १८ -५५ mm आहे आणि माझी १८ -१४५ mm आहे तरीपण clear picture नाही". मनात म्हटलं काही गरज आहे का लायकी काढायची?? आतामात्र  पुढच्या जंगल सफारी आधी लेन्स हवीच.
 १५ मिनिटात आम्ही वाघाची आणि सिंहाची सफारी आटोपून परत आलो. आतामात्र म्हटलं , पुरे झाल..इतकी फजिती बास झाली...परत जाऊ..
पण त्याचवेळी ठरवलं कि पावसाळ्यात परत येवू.
आम्ही बाहेर आलो आणि मस्तपैकी जेवण केल.आणि बस ने जायचा कंटाळा आला, मग म्हटलं मस्तपैकी taxi करूनच जावू. मंदार तिथूनच त्याच्या so called मिटिंग ला गेला. आणि आम्ही taxi ने घोड्बुंदर रोड ला आलो. घोड्बुंदर रोड ला ओवाळ्यापर्यंत अर्ध्या तासात आलो आणि पुढ पूर्ण ट्राफिक जाम होत..अंगावर काटाच आला ती गर्दी बघून..कसातरी आतून वाटकाढत taxi कासावाडवली पर्यंत आली आणि तिथून पुढ जाण्यासाठी ४ तास लागतील असा कळलं, मग काय आलीय भोगासी म्हणून चालायला सुरवात केली. जवळ जवळ १० लाख लोक त्यावेळी घोडबंदर रोड वर होती. (१०लाखचा आकडा उपेंद्र न सांगितला नंतर). जिथ माणसांना चालायला जागा नव्हती तिथ गाड्या काय चालणार?? हळू हळू चालायला लागलो..पण इतके थकलो होतो कि पुढ चलन अशक्य झाल..मग म्हटलं मस्तपैकी एखाद हॉटेल बघू इथे आणि आजची रात्र काढू. लेक खुश एकदम. पण नेमक तेवढ्या area मध्ये कुठेच हॉटेल नव्हत. शेवटी शोधात शोधात आम्ही ब्रम्हांडपाशी पोहोचलो आणि जीव भांड्यात पडला माझा..उपेंद्र तिथे घ्यायला येतो म्हणाला...वाह, आता साधारण एका तासात घरी पोहोचण्याची खात्री झाली. पण शर्वरीन दंग सुरु केला,"तू बोलली होतीस आज हॉटेल मध्ये राहू, आता मला हॉटेल मधेच राहायचं आहे". मनात म्हटलं आता हि काही आईकाणार नाही..आधीच खूप थकले होते. तिला म्हटलं, "तूला मस्तपैकी आपण barbie घेवू". madam खुश..चला आता फक्त उपेन्द्राची वाट बघायची.
शेवटी साई आणि सास्वतीला एक रिक्षा मिळाली आणि ते स्टेशन वर गेले. शेवटी उपेंद्र आला...जसा तो दिसला तसं मला 'अजि म्या ब्रह्म देखिले' चा  आनंद झाला....

4 comments:

  1. Hi Anagha...this is after a long time i have gone through any marathi text.....it was really ossum and excellent..... :)..sai..

    ReplyDelete
  2. mala awadla tuza blog...chan lihites tu shaili oghavati ahe tuzi prayatna kelas tar changli lekhika hoshil sachin joshi

    ReplyDelete
  3. chan lihle ahes..........maja ali na thoda plan fasala avdhech...gouri

    ReplyDelete