कळसुबाई , महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर ,समुद्र सपाटी पासून ५४०० फुट उंचीवर असणारं हे शिखर . दोन वर्षापूर्वी 'शिखर वेध ' बरोबर जायचं नक्की केला , पण आयत्यावेळी तब्येतीच्या कारणास्तव जाता आलं नाही . मनाला सारख लागून राहिलं , आपण कळसुबाई ला जाऊ शकलो नाही . या वर्षी ठरवलं होतचं, काहीही झाल तरी कळसुबाई चा ट्रेक करायचाच.
शिखर वेध च्या तिसर्या बॅच बरोबर जायचं ठरवलं , पण ऐनवेळी शर्वरीची तब्येत बिघडली आणि माझ जाणं परत रद्द झालं. मनात आल यावर्षी पण कळसुबाई आपल्या नशिबात दिसत नाही , म्हणून मग पेब फोर्ट ला तरी जाऊ असा म्हणून तो ट्रेक ठरवला आणि त्याच दिवशी जगदीशचा (शिखरवेध चा सर्वेसर्वा) मेल आला कि चौथी बॅच १० ऑगस्ट ला जाणार आहे. मनात आलं पेब नको , कळसुबाई ला जाऊ . तसा सांगितलं जगदीशला . शेवटपर्यंत धाकधूक होती मनात . ऎनवेळी ट्रेक रद्द होईल अशी भीती वाटत राहिली . शर्वरी हट्ट धरून बसली , मी पण येते . जरा टेंशन आलं , आता कसा समजवायचं ? मग कशीतरी समजूत काढली . कळसुबाई ला जाण्यासाठी बस मला नाशिक - भिवंडी टोल नाक्याच्या इथे मला घेवून जाण्यासाठी थांबणार होती. आणि वेळ होती रात्री साधारण १२ वाजता ची . उपेंद्र सोडायला येणार होता. साधारण ११.४५ ला जगदीश ला फोन केला , तर त्यावेळी तो सायन ला होता येपर्यंत अजून अर्धा -पाऊण तास तरी सहज लागणार होता . तिथून तो ठाण्यात तीन हात नाक्याला अजून दोघांना घेवून मग मला घेण्यासाठी येणार होता. शेवटी १ वाजता बस आली आणि आम्ही निघालो . बस मध्ये डुलकी काढायचा प्रयत्न केला पण फारशी झोप लागली नाही. ४ वाजता आम्ही बारी ला पोहोचलो . आणि बस मधेच डुलकी काढली. हवा थंड होती . साधारण उजाडल्यावर एक एक जण खाली उतरायला लागला . आजुबाजूच वातावरण प्रसन्न होतं . हवा ढगाळ असली तरी , थंड असल्यामुळे मस्त वाटत होतं. आजूबाजूच्या घरातील बायका तिथेच असलेल्या बोर चे पाणी भरायला आल्या होत्या . त्या शांत वातावरणात तोच काय तो आवाज ऎकु येत होता. आमचा चहा आणि नाश्ता झाल्यावर आम्ही निघणार होतो.

साधारण ७ वाजता आम्ही सगळे आटोपून निघालो . सुरवातीला ओढ्यामधून जाताना पाणी खूप गार असल्याच जाणवलं . शेत पार केलं आणि आता चढायला सुरवात केली. मी अगदी हळू चढते , एक तर सवय नाही अज्जिबात त्यामुळे थकायला खूप चटकन होतं. दुसरं , फोटो काढायचे म्हणून कॅमेरा घेतला होता , त्याच ओझ होत खूप . हळू हळू वार जात होते , बाकी सगळे त्यामानान पटपट निघाले होते .चढताना काहीतरी खायला मिळेल म्हणून २-३ कुत्री पण आमच्या बरोबर चढायला लागली .
मी चढत असताना वाटेत थांबत होते, थांबले कि डासांसारखे किडे पायाला चावत होते. पायावर त्यामुळे लालसर वर्तुळ आणि जिथे तो किडा चावायाचा तिथे थोडा जास्त लाल असा दिसत होतं . थोडी पुढे गेल्यावर , जगदीश ने कॅमेरा ब्याग घेतली , म्हणजे तरी मी पटपट चढेन असा वाटल त्याला . पण , आमची गोगलगाय काही आपला वेग बदलायला तयार नाही . असो , हा ट्रेक सोपा समजला जातो कारण वरपर्यंत जाण्यासाठी शिड्या आहेत, काही लोखंडाच्या तर काही दगडांच्या . पण अंतर जास्त आहे . आम्ही वर जात असताना अधे मध्ये येणारी पावसाची सर सगळ थंड करून सोडत होती . खूप छान वाटत होतं .डोक्यावरून जाणारे ते पावसाचे ढग अतिशय सुंदर दिसत होते . ट्रेक सोपा असला तरी लोखंडी शिडीवरून जाताना धडकी भरत होती. खाली पडलो तर कपाळमोक्ष नक्कीच होता . मधेच मी जगदीश ला विचारलं अजून किती बाकी आहे , तो म्हणाला आपण ६५ % पूर्ण केलं आहे . बापरे! एवढं चढून पण ६५% च?? मला वाटत होतं , फार तर १०-१५% राहिलं असेल आता. मध्ये मध्ये थांबत थांबत जात असताना आजूबाजूला निसर्गानं काय उधळण केली आहे ते दिसत होत. त्या शांत वातावरणात येणारा पक्ष्यांचा आवाज आणि दोन्ही बाजूला कोसळणाऱ्या धबधब्यांचा आवाज . आपण शहरात राहून कोणत्या गोष्टीना मुकतो हे खूप तीव्रतेन जाणवलं. साधारण ७०-७५ % ट्रेक पूर्ण झाल्यावर , थोडा थांबून शिडीवरून खाली बघितलं तर दरी दिसतचं नव्हती , सगळीकडे ढगांच पांघरूण दिसत होतं. फारतर १०-१२ फुटांपर्यंत झाडी दिसत होती , त्यापुढे ढगांच पांघरूण.
हा मेलेला साप आढळला . तसाच एक जिवंत साप पण दिसला होता . काहीतरी मटकावून शांत पडला होता . पोट बराच फुगलेलं होतं त्याचं .
वरती जाताना वाटेत दोन ठिकाणी भजी आणि चहा विकणारी २-३ दुकानं होती . खूप इच्छा झाली , पण त्रास होईल (मागच्या ट्रेक चा अनुभव) म्हणून मी टाळलं. वाटेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमललेली दिसली . काही पांढरी तर काही जांभळी .
हळू हळू वरती चढत शेवटी मी पोहोचले , पाय अतिशय दुखत होते . पण वरती पोहोचल्यावर सगळं विसरले . कळसुबाई आपण चढलो याचाच आनंद खूप झाला. आजूबाजूला असणारे पावसाचे ढग त्यामुळे फारसं काही दिसत नव्हतं . आपण पावसाच्या ढगात आहोत असा काहीसं मनाला वाटत होतं. वरती वारा मात्र भरपूर होता ,जोडीला पाउस आणि थंडी होतीच . आम्ही फार वेळ थांबू शकलो नाही . लगेच उतरायला सुरवात केली . आता मात्र परीक्षा होती . वर चढताना जाणवलं नाही पण उतरताना मात्र अन्तर खूप असल्याची जाणीव झाली. त्यातच सतत पाउस पडल्यामुळे परतीचा रस्ता निसरडा झाल्याची शक्यता खूप होती. हळू हळू उतरायला सुरवात केली . पाय मात्र आता जाम बोलायला लागले होते . प्रत्येक पाउल जड झालं होतं . त्यात सुद्धा शिड्या बर्या वाटत होत्या उतरताना , पण दगडांवरून उतरताना मात्र हालत वाईट होत होती . सगळीकडे निसरडं झाल्यामुळे खूप जपून उतरावं लागत होतं . आमच्या ग्रुप मधल्या एका मुलीच्या बुटाच सोल निघालं , तिला चालताना जाम त्रास होत होता. १-२ जण फ्लोटर घालून आले होते , त्यांचे पाय घसरत होते . बरीच कसरत चालू होती . मला मात्र आपण खालीपर्यंत कधी पोहोचणारच नाही असं काहीसं वाटायला लागलं होतं . अजून थोडा पुढे, अजून थोडा पुढे करत करत शेवटी मी खाली उतरले. येताना पाय आणि बूट इतके मातीने बरबटले होते कि ओढ्यातून तशीच चालत गेले , खरंतर बूट काढायची ताकदच राहिली नव्हती . पण ती खूप मोठी चूक झाली. पाणी खूप थंड होतं . बुटात पूर्ण पाणी भरलं आणि पाय एकदम गार झाले . आमच्यातले काहीजण तिथ जवळच असणारा धबधबा बघायला गेले .मी मात्र तशीच चालत बस पर्यंत आले . आणि बूट काढून बसमध्ये ठेवले . बसमध्ये बसल्यावर मात्र खूप बऱ वाटलं . एक लढाई जिंकल्याच समाधान मिळालं .
सगळे परत आल्यावर आम्ही जेवलो . जेवायला बटाट्याची भाजी , उसळ, चपाती , भात आणि वरण असा मेनू होता . जाम भूक लागली होती , त्यामुळे जेवण मस्त वाटलं एकदम . जेवण झाल्यावर आम्ही परत निघालो. बस मध्ये आता सगळेच डुलक्या काढायला लागले. साधारण ७ वाजता मी टोल नाक्याला पोहोचले . उपेंद्र आला होता घ्यायला . घरी येवून एकदा अंघोळ करून मेतकुट भात खाल्यावर मात्र मला एकदम सगळ्याच सार्थक झाल्यासारख वाटल . पाय मात्र अजूनही खूप दुखत आहेत , पण एक समाधान पण आहे.
शिखर वेध च्या तिसर्या बॅच बरोबर जायचं ठरवलं , पण ऐनवेळी शर्वरीची तब्येत बिघडली आणि माझ जाणं परत रद्द झालं. मनात आल यावर्षी पण कळसुबाई आपल्या नशिबात दिसत नाही , म्हणून मग पेब फोर्ट ला तरी जाऊ असा म्हणून तो ट्रेक ठरवला आणि त्याच दिवशी जगदीशचा (शिखरवेध चा सर्वेसर्वा) मेल आला कि चौथी बॅच १० ऑगस्ट ला जाणार आहे. मनात आलं पेब नको , कळसुबाई ला जाऊ . तसा सांगितलं जगदीशला . शेवटपर्यंत धाकधूक होती मनात . ऎनवेळी ट्रेक रद्द होईल अशी भीती वाटत राहिली . शर्वरी हट्ट धरून बसली , मी पण येते . जरा टेंशन आलं , आता कसा समजवायचं ? मग कशीतरी समजूत काढली . कळसुबाई ला जाण्यासाठी बस मला नाशिक - भिवंडी टोल नाक्याच्या इथे मला घेवून जाण्यासाठी थांबणार होती. आणि वेळ होती रात्री साधारण १२ वाजता ची . उपेंद्र सोडायला येणार होता. साधारण ११.४५ ला जगदीश ला फोन केला , तर त्यावेळी तो सायन ला होता येपर्यंत अजून अर्धा -पाऊण तास तरी सहज लागणार होता . तिथून तो ठाण्यात तीन हात नाक्याला अजून दोघांना घेवून मग मला घेण्यासाठी येणार होता. शेवटी १ वाजता बस आली आणि आम्ही निघालो . बस मध्ये डुलकी काढायचा प्रयत्न केला पण फारशी झोप लागली नाही. ४ वाजता आम्ही बारी ला पोहोचलो . आणि बस मधेच डुलकी काढली. हवा थंड होती . साधारण उजाडल्यावर एक एक जण खाली उतरायला लागला . आजुबाजूच वातावरण प्रसन्न होतं . हवा ढगाळ असली तरी , थंड असल्यामुळे मस्त वाटत होतं. आजूबाजूच्या घरातील बायका तिथेच असलेल्या बोर चे पाणी भरायला आल्या होत्या . त्या शांत वातावरणात तोच काय तो आवाज ऎकु येत होता. आमचा चहा आणि नाश्ता झाल्यावर आम्ही निघणार होतो.

साधारण ७ वाजता आम्ही सगळे आटोपून निघालो . सुरवातीला ओढ्यामधून जाताना पाणी खूप गार असल्याच जाणवलं . शेत पार केलं आणि आता चढायला सुरवात केली. मी अगदी हळू चढते , एक तर सवय नाही अज्जिबात त्यामुळे थकायला खूप चटकन होतं. दुसरं , फोटो काढायचे म्हणून कॅमेरा घेतला होता , त्याच ओझ होत खूप . हळू हळू वार जात होते , बाकी सगळे त्यामानान पटपट निघाले होते .चढताना काहीतरी खायला मिळेल म्हणून २-३ कुत्री पण आमच्या बरोबर चढायला लागली .मी चढत असताना वाटेत थांबत होते, थांबले कि डासांसारखे किडे पायाला चावत होते. पायावर त्यामुळे लालसर वर्तुळ आणि जिथे तो किडा चावायाचा तिथे थोडा जास्त लाल असा दिसत होतं . थोडी पुढे गेल्यावर , जगदीश ने कॅमेरा ब्याग घेतली , म्हणजे तरी मी पटपट चढेन असा वाटल त्याला . पण , आमची गोगलगाय काही आपला वेग बदलायला तयार नाही . असो , हा ट्रेक सोपा समजला जातो कारण वरपर्यंत जाण्यासाठी शिड्या आहेत, काही लोखंडाच्या तर काही दगडांच्या . पण अंतर जास्त आहे . आम्ही वर जात असताना अधे मध्ये येणारी पावसाची सर सगळ थंड करून सोडत होती . खूप छान वाटत होतं .डोक्यावरून जाणारे ते पावसाचे ढग अतिशय सुंदर दिसत होते . ट्रेक सोपा असला तरी लोखंडी शिडीवरून जाताना धडकी भरत होती. खाली पडलो तर कपाळमोक्ष नक्कीच होता . मधेच मी जगदीश ला विचारलं अजून किती बाकी आहे , तो म्हणाला आपण ६५ % पूर्ण केलं आहे . बापरे! एवढं चढून पण ६५% च?? मला वाटत होतं , फार तर १०-१५% राहिलं असेल आता. मध्ये मध्ये थांबत थांबत जात असताना आजूबाजूला निसर्गानं काय उधळण केली आहे ते दिसत होत. त्या शांत वातावरणात येणारा पक्ष्यांचा आवाज आणि दोन्ही बाजूला कोसळणाऱ्या धबधब्यांचा आवाज . आपण शहरात राहून कोणत्या गोष्टीना मुकतो हे खूप तीव्रतेन जाणवलं. साधारण ७०-७५ % ट्रेक पूर्ण झाल्यावर , थोडा थांबून शिडीवरून खाली बघितलं तर दरी दिसतचं नव्हती , सगळीकडे ढगांच पांघरूण दिसत होतं. फारतर १०-१२ फुटांपर्यंत झाडी दिसत होती , त्यापुढे ढगांच पांघरूण.
हा मेलेला साप आढळला . तसाच एक जिवंत साप पण दिसला होता . काहीतरी मटकावून शांत पडला होता . पोट बराच फुगलेलं होतं त्याचं .
वरती जाताना वाटेत दोन ठिकाणी भजी आणि चहा विकणारी २-३ दुकानं होती . खूप इच्छा झाली , पण त्रास होईल (मागच्या ट्रेक चा अनुभव) म्हणून मी टाळलं. वाटेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमललेली दिसली . काही पांढरी तर काही जांभळी .
हळू हळू वरती चढत शेवटी मी पोहोचले , पाय अतिशय दुखत होते . पण वरती पोहोचल्यावर सगळं विसरले . कळसुबाई आपण चढलो याचाच आनंद खूप झाला. आजूबाजूला असणारे पावसाचे ढग त्यामुळे फारसं काही दिसत नव्हतं . आपण पावसाच्या ढगात आहोत असा काहीसं मनाला वाटत होतं. वरती वारा मात्र भरपूर होता ,जोडीला पाउस आणि थंडी होतीच . आम्ही फार वेळ थांबू शकलो नाही . लगेच उतरायला सुरवात केली . आता मात्र परीक्षा होती . वर चढताना जाणवलं नाही पण उतरताना मात्र अन्तर खूप असल्याची जाणीव झाली. त्यातच सतत पाउस पडल्यामुळे परतीचा रस्ता निसरडा झाल्याची शक्यता खूप होती. हळू हळू उतरायला सुरवात केली . पाय मात्र आता जाम बोलायला लागले होते . प्रत्येक पाउल जड झालं होतं . त्यात सुद्धा शिड्या बर्या वाटत होत्या उतरताना , पण दगडांवरून उतरताना मात्र हालत वाईट होत होती . सगळीकडे निसरडं झाल्यामुळे खूप जपून उतरावं लागत होतं . आमच्या ग्रुप मधल्या एका मुलीच्या बुटाच सोल निघालं , तिला चालताना जाम त्रास होत होता. १-२ जण फ्लोटर घालून आले होते , त्यांचे पाय घसरत होते . बरीच कसरत चालू होती . मला मात्र आपण खालीपर्यंत कधी पोहोचणारच नाही असं काहीसं वाटायला लागलं होतं . अजून थोडा पुढे, अजून थोडा पुढे करत करत शेवटी मी खाली उतरले. येताना पाय आणि बूट इतके मातीने बरबटले होते कि ओढ्यातून तशीच चालत गेले , खरंतर बूट काढायची ताकदच राहिली नव्हती . पण ती खूप मोठी चूक झाली. पाणी खूप थंड होतं . बुटात पूर्ण पाणी भरलं आणि पाय एकदम गार झाले . आमच्यातले काहीजण तिथ जवळच असणारा धबधबा बघायला गेले .मी मात्र तशीच चालत बस पर्यंत आले . आणि बूट काढून बसमध्ये ठेवले . बसमध्ये बसल्यावर मात्र खूप बऱ वाटलं . एक लढाई जिंकल्याच समाधान मिळालं .

मस्तच अनुभव...नेहमीप्रमाणे बालपणात न रमता वर्तमानात आलात...पण मधला काळ...पण सगळं बाजूला ठेवून...न दमता चालता आले पाहीजे...याकरिता प्राधान्य दिले पाहीजे.नाहीतर पुढच्या अनुभवात, होणाऱ्या ञासाबद्दलच जास्त नकळतपणे लिहीले जाईल...fitness must...पुढचा एखादा blog त्यावरच...फोटो download होत नाहीत...पण अनुभव नक्कीच प्रेरणा देणारा आहे
ReplyDelete