माझी दुसरी अत्यंत जवळची मैत्रीण म्हणजे मेधा . माझ्या घराजवळ रहायची पण आमची मैत्री व्हायला ११ वी उजाडायला लागली . आमची ओळख झाली ती एका कॉमन मैत्रिणीमुळे. आणि नंतर आम्हीच जास्त जवळच्या मैत्रिणी झालो . दोघी पण भांडायचो भरपूर , पण भांडलो नाही तर दिवस सुनासुना जायचा . तिला आणि मला , दोघींना पण भटकायची सवय खूप त्यामुळे एकत्र फिरायचो पण भरपूर . अर्थात, आमची जोडी लौरेल औंड हार्डी ची होती . ती एकदम नाजूक चणीची आणि बारीक होती पण काटक खूप .खुप रसिक, खरतर तिच्यामुळे मी पार्लर ला जायला लागले . कॉलेज मध्ये आमचे ग्रुप वेगवेगळे होते , पण जाण येण एकत्र आणि राहणं जवळं त्यामुळे आमच्यात कधी अंतर पडल नाही .
first year पासून आमच कॉलेज सकाळी असायचं. मग काय ? आम्ही लवकर उठून , तयार होवून एकत्रच जायचो. कॉलेज संपल कि एकत्रच परत यायचो. दुपारी माझ्या घरी कुणी असायचं नाही , मग मेधा थोडा वेळ येवून बसायची आणि मग झोपायला जायची . तिचे बाबा काही बाबतीत खूप शिस्तीचे होते , जसं दुपारी तिने थोडा वेळ झोपलं पाहिजेच हा दंडक होता त्यांच्यात . कधी कधी संध्याकाळचा स्वंपाक पण असायचा तिच्याकडे. तिची दुपारची झोप झाली कि आम्ही परत भटकून येत असु .
असा करता करता आमचं कॉलेज पूर्ण झालं , आणि दोघींना पण MBA करायचे वेध लागले . फक्त थोड्या उशिरा जाग्या झाल्यामुळे त्या वर्षीची CET झाली होती. मग मी कॉम्पुटर क्लास ला अडमिशन घेतली . माझा क्लास सकाळी असायचा. आम्ही आमचा दिनक्रम ठरवला .
सकाळी लवकर उठून आम्ही रंकाळ्यावर फिरायला जायचो. ५.४५ ला घरातून निघायचो , शालिनी पॅलेस समोर थोडावेळ बसायचो आणि मग परत यायचो . आवरून मी क्लास ला जायचे आणि साधारण ११-११. ३० पर्यंत परत यायचे . मगं ती आणि मी आम्ही भर उन्हाच्या बाजारात जायचो , रोज काही न काही आणायचं असायचं . बंर , मंडई घरापासून अगदी जवळ असल्यामुळे कुणी नको पण म्हणायचे नाही . कधी कलिंगड आण तर कधी सीताफळ आण असा काही न काही कायम सुरु असायचचं . ते घेवून आम्ही माझ्या घरी यायचो आणि मनसोक्त हादडायचो. कधी कधी कलिंगडाच्या सोबतीला भजी वगैरे पण तळली जायची . धमाल असायची . संध्याकाळी आम्ही परत बाहेर पडायचो , कधी रंकाळा तर कधी भवानी मंडप असा फेरा मारायचो . तिथे दोघींमध्ये एक प्लेट पाणीपुरी नाहीतर अर्धी पावभाजी , नाहीतर सँडवीच, नाहीतर अर्धी चाट खायचोच , अगदी रोज .
असच माझं एकदा शिवाजी विद्यापीठ मध्ये काम होतं म्हणून मी मेधा ला विचारलं तर ती येते म्हणाली . त्यावेळी माझ्याकडे लुना होती . आम्ही लुना घेवून जायचं ठरवलं . आणि विद्यापीठ परिसरात तिला लुना चालवायला द्यायचं मी कबुल केलं. काम संपवून परत येताना तिच्या हातात लुना होती,काय डोक्यातं आलं तिच्या देव जाणे . तिने एकदम भरधाव सोडली लुना , आणि एका वळणाला तिला ती आवरता न आल्यामुळे आम्ही दोघींनी साफ लोटांगण घातलं . त्यात तिचा पाय पायडलच्या मागे अडकला , भरपूर लागलं तिला . आमच्या सुदैवाने मागून काही मुलं येत होती , त्यांनी मदत केली . लुनाचा हेडलाईट तुटला होता आणि चाक पण वाकडं झालं होतं . परत येताना धाबे दणाणले होते आमचे , घरी काय सांगायचं ? अवतारावरून आम्ही पडलो होतो हे लगेच कळत होतं . शेवटी माझ्या घरी थोडं थांबून तिने घरी जायचं ठरवलं . माझ्या घरी लुना माझ्या हातात होती हे सांगायचं ठरलं आणि तिच्या घरी तिच्या . यामुळे बसणारा ओरडा कमी झाला असता आणि एकमेंकीना भेटण्यापासून कुणी थांबवलं नसतं . घरी मी बाबांना सांगितलं तसं आणि हे पण सांगितलं कि लुना च हंड्ल वरखाली होत होतं म्हणून असं झालं. बाबा त्यावर केदार ला ओरडले . मला वाईट वाटलं पण काही इलाज नव्हता. मग आम्ही डॉक्टर कडे गेलो दोघी . जखमा बऱ्या व्हायला वेळ लागला पण आम्ही मात्र तशाच एकत्र राहिलो .
पुढे २-३ महिन्यातचं तीच लग्न ठरलं आणि मग आमचं भटकण थोडं जास्त झालं. तिची आजी ओरडायची आम्हाला पण त्याने आम्हीला काही फरक पडा़चा नाही. बघता बघता लग्न झालं आणि ती सांगलीला गेली . आणि पूर्णपणे संसारात गुरफटली .
अजूनही आमच बोलणं होतं पण भेटणं मात्र खूप कमी झालं आहे , अर्थात यावर ती भरपूर शिव्या खाते कारण सध्यातरी तिच्याकडे आम्हा मैत्रिणींसाठी वेळ नसतो. अर्थात यात जमेची एकाच बाब म्हणजे तिची मुलगी आणि माझी मुलगी पण मैत्रिणी आहेत , खूप जवळच्या नाहीत पण एकमेकी बरोबर पूर्ण दिवस काढू शकतात असा तर नक्कीच आहेत .

No comments:
Post a Comment