Monday, 3 November 2014

एक स्वप्न

एक सकाळ ,
थोडीशी धुक्यात गुरफटलेली ,
थंडीने हात दिलेली,
मन प्रसन्न करणारी ,
आजूबाजूला येणारे पक्ष्यांचे आवाज ,
पायाखाली असणारी मातीची पायवाट,
त्या पायवाटेच्या शेवटी दिसणारी माती आणि शेणानं सारवलेली झोपडी
पायवाटेच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडांची दाटी
त्या झाडांच्या  पायथ्याशी फुललेली रान फुल
या सगळ्यात येणारा सकाळचा रानाचा गंध , थोडा ओल्या मातीचा आणि थोडा झाडांचा
पायाखाली चुरडली जाणारी ती वळलेली पानं ,काटक्या , फुलं
सगळ्याचा मनावर चढलेला अंमल
झोपडीत उकळी घेणारा आल्याचा चहा
आताच जाणवतो आहे मनाला
त्या झोपडीच्या अवतीभोवती थोडं साफ केलेलं अंगण
अंगणाच्या भोवतीने लावलेले गावठी गुलाब
त्याच्या मागे असलेली विहीर
त्यावर कुरकुरणारा रहाट
अधे मध्ये पाणी काढल्याचा आवाज
सकाळ थोडी वर येतेय आता , धुक्यातून , थंडीतून
पण फक्त वाढणारा उजेड जाणवून देतोय सुर्यानारायणाचं वरती येण
नाहीतर इथल्या झाडीत उजेड सदा हरवल्यासारखा सापडतो
पक्षी आता आपल्या कामाला निघून गेलेत
मी मात्र शांत
आजूबाजूला सगळ्या शांततेत हरवलेली
एखाद्या योग्याला सुद्धा मिळणार नाही अशी जागा … माझ्या मनातली … माझ्या स्वप्नातली

6 comments:

  1. Wah wah..sundar prakatan..awadle.

    ReplyDelete
  2. Khup sundar!��

    ReplyDelete
  3. शब्दातून प्रत्यक्ष चिञ ऊभे करण्याची तुमची अंगभूत असलेली शैली....दैवी देणगी आहे..पण

    ReplyDelete
  4. पण...याकरिता आहे की ...अनघाजींनी लेखनाला न्याय दिला पाहीजे...लघुकथा, कथा,कादंबरी असे साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले पाहीजेत ....पण!
    या 'पण' वर अनघाजींनी व्यक्त झाले पाहीजे.,

    ReplyDelete
  5. You shd try at commercial writing too.... I m sure u ll b liked by lot many people...

    ReplyDelete