मनं वाळत चालली आहेत..
झाडांमधला हिरवेपणा लोप पावतो आहे तशी
मनं वाळत चालली आहेत...
नात्यांमध्ये अडकण नको की जबाबदारी नको
मनं वाळत चालली आहेत
फ़क्त माझं, मला चा घोष वाढत चालला आहे
मनं वाळत चालली आहेत...
रस्त्यांवरच्या फटक्या पोरांकड नाक उडवून बघताना
मनं वाळत चालली आहेत
अपघाताचे फोटो घेण्यात धन्यता मानणारी
मनं वाळत चालली आहेत
जीवघेण्या स्पर्धांमध्ये स्वत:च्या २-३ वर्षाच्या मुलांना ढकलणारी
मनं वाळत चालली आहेत
मुलांचे बोबडे बोल ऐकण्यापेक्षा टीव्ही वरच्या मालिकांमध्ये नाहीतर खरेदी मध्ये गुंतलेली
मनं वाळत चालली आहेत
बलात्काराच्या बातम्या बघुन आपल्या पर्यन्त नाही ना पोहोचल?म्हणत
मनं वाळत चालली आहेत
थंड पडलेल्या रक्ताने एक एक दिवस ढकलत
मनं वाळत चालली आहेत
जगण्याचा अर्थ हरवत असतानाच,
दुकानापुढे बसलेल्या म्हाताऱ्या आज्जीला जेव्हा जेवायला म्हणून शर्वरी २० रुपये देते, सहजपणे...
तेव्हा वाटतं मन वाळली नाहीत अजुन, ओलावा आहे
थोड पाणी घालायची गरज आहे...
Khupach sundar anagha
ReplyDeleteछान मांडलय..खरच कोडगेपणा वाढत चाललाय. ओलावा आपणच जपायला हवा.. शर्वरी चे कौतुक.:-)
ReplyDeleteखुपच छान.....संवेदनशीलता आणि समाज यांमधील वाढती दरीबद्दल आपले भाष्य खुपच वास्तवादी आहे....त्याचवेळी शर्वरी भविष्यातील आशेचा किरण आहे.....
ReplyDelete