परवा ३ ऑगस्ट , मैत्री दिवस (friendship day ). असा दिवस जो आजकाल साजरा करायला बरेचजण धडपडतात. पण खरं तर हे नातं रोजच साजरं होतं , त्यासाठी विशिष्ट अशा दिवसाची काहीच गरज नसावी , असा मला वाटतं . सगळ्या नात्यांपेक्षा जास्त आपुलकीने जपलेले असा एकाच नातं असतं . मगं ते नवरा - बायकोमधील असो , आई -मुलांमधील मधील असो किंवा वडील-मुलांमधील असो.
अर्थात, या निमित्ताने मला माझ्या मित्र मैत्रिणींबद्दल काही न काही आठवत राहत , कडू गोड सगळंच . माझी मैत्री या शब्दाची ओळखच झाली ती एका मैत्रिणीमुळे.
साधारण ३-४थी मध्ये असू आम्ही तेव्हा . शनिवार असल्यामुळे आई लवकर घरी आली होती . दळप करायचं होता म्हणून ती आणि तिच्यामागे लागून मी , आम्ही गिरणी मध्ये गेलो . गिरणी घरापासून अगदी जवळ होती. अंगात शाळेचाच ड्रेस होता अजून. तिथे अजून एक माझ्यासारखीच मुलगी आणि तिची आई आल्या होत्या . तिच्या अंगावर पण माझ्याच शाळेचा युनिफॉर्म होता . अंगावर शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे त्या दोघींनी एकमेकींशी बोलायला सुरवात केली (म्हणजे आमच्या आयांनी ). मग आम्ही पण बोलायला लागलो. दोघी पण एकाच वयाच्या होतो पण शाळेत कधी बोललो न्हवतो. पण इथे मात्र बडबडायला सुरवात केली . मग ती घरी आली आणि येतंच राहिली . आमची घट्ट मैत्री झाली . भाऊ आणि माझा भाऊ पण एकाच वयाचे होते पण त्यांच्यात मात्र फारशी मैत्री जमली नाही . पण बरेचदा आम्ही चौघे एकत्र येवून धुमाकूळ घालायचो. तीच नाव प्रतिमा कुलकर्णी (पची). माझी सगळ्यात पहिली मैत्रीण. तिच्या आजीचा बंगला होता शिवाजी पार्क मध्ये , मी बरेचदा तिच्याबरोबर जायचे. तिच्याबरोबर असं जाणं खूप आवडायचं मला. पुढे ५ वी ला आल्यावर मात्र आमच्या तुकड्या बदलल्या. ती वेगळ्या तुकडीत आणि मी वेगळ्या . दोघींना पण नवीन मैत्रिणी मिळाल्या . बरेचदा पाची ची आठवण यायची पण तोपर्यंत तिच्या पण मैत्रिणी झाल्या होत्याच. हळू हळू अंतर पडत गेलं. आधी नुसत्या बडबडणार्या आम्ही आता मात्र फारच कमी बोलत होतो . पुढे एकाच कॉलेज मध्ये असूनपण फारस बोलन व्हायचं नाहीच . त्यातच काका गेल्याच कळल आणि धक्काच बसला . तिच्या समोर पण जाऊ नये असा वाटत होतं ( किती मूर्खपणा होता तो , ते आता कळतंय ). मी आणि आई जाउन काकुना भेटून आलो . आमच B. Com. संपल आणि पची च लग्न झालं . अर्थात लग्नाला गेले होते मी पण एका लांबच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाव तशी .(काय होता एवढ मनात माझ्या ? कशाचा इगो होता? अजूनही लक्षात येत नाही ). ती त्याच दिवशी नागपूर ला जाणार होती . तिला निरोप द्यायला मी गेले होते , रेल्वे स्टेशन वर. तीच शेवटची भेट. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी केदार चा फोन आला मला , तुला "कृतिका उदर " म्हणून एक friendship request आली आहे ना FB वर ? ती पची आहे . मी तीनताड उडाले . पची ?? कृतिका उदर ?? काही संदर्भाच लागेना . मी request मान्य केली . मग आम्ही बोलायला लागलो. तिने तीच नावच बदललं होतं कृतिका म्हणून आणि अचानक तिचा फोन आला मला . खूप भरभरून बोलली, लग्नानंतर काय काय झालं ते , काका - काकुंबद्दल , भावड्या (तिचा भाऊ) बद्दल , लहानपणाच्या सगळ्या आठवणींबद्दल, त्यावेळी ५वी मध्ये आम्ही ज्या पद्धतीने वेगळ्या झालो होतो ते खूप लागल होत तीला . कशी आणि काय समजावणार होते तिला ? ते वय इतक कळण्याच नव्हत, एवढंच कसबस बोलू शकले. ती मात्र मला खूप लागल होतं ते सांगत राहिली आणि खूप वर्षांनी जाणवलं आपण पण तेवढाच प्रेम केलं होतं तिच्यावर कारण तिच्यानंतर तशी मैत्री कुणाशी झालीच नाही. त्या नकळत्या वयातल्या मैत्रीने खूप काही शिकवलं होतं जे आता जाणवत आहे. आता मात्र तिला अंतर द्यायचं नाही हे पक्क ठरवलं आहे . तिच्यामुळे मला मैत्री कळली , मैत्रीमधलं प्रेम कळल. सध्या ती फिनलंड ला राहते . त्यामुळे अजून तरी आमची भेट नाही . पण लवकरच भेटू आम्ही.

मैञीचे अंतरंग ....त्याचे नकळत बदलणारे स्वरूप ...सहजपणे मांडलेत...छान
ReplyDelete