माझ्या मनाच्या कोपर्यात असणारा तु… असा अचानक उसळी मारुन वरती येतोस. . आणि मला जाणीव करून देतोस, तू आहेस … माझ्याबरोबर आहेस … माझ्या मनामध्ये तुझा वावर सततचा आहे… पण तू कुणाला दिसत नाहीस … मी जी कुणी आहे ती तुझ्यामुळे आहे… तुझ्यामुळे मला अस्तित्व आहे …
कधी कधी वाटतं तु हरवला आहेस… दूर कुठेतरी निघुन गेला आहेस…माझा सखा मला सोडून गेला आहे… मग मी शोधत राहते तुला … माझ्यामध्ये… माझ्या मनामध्ये … आजुबाजूच्या लोकांमध्ये, कुठे दिसतोस का ते बघते… तुझी एखादी झलक … एक नजर … कुठे आहे , कुठे आहे ? कितीही, काहीही केलं तरी मनाचा धोशा काही कमी होत नाही. माझं मन माझ ऐकत नाही … खरतर उगाचच असं म्हणायचं , तसंपण ते तुझंच ऐकतं … त्याला फक्त तुझ्याच सूचना कळतात. मेंदूचा भुगा होईपर्यंत विचार करते मी … मग थकते… तू निघून गेला आहेस अशी समजूत काढते स्वतःची, म्हणजे कुणाची , ते माहिती नाही , कारण, तू आयुष्यात आलास आणि मी माझी राहिले नाही… मन आक्रंदत राहतं… माझा सखा शाम मुरारी इथेच आहे … कुठेच नाही गेला आहे… पण दुसरं मन ऐकत नाही ते सारखं म्हणंत रहातं तो नाहीये … जो होता तो एक भास होता … तो तुझा कधीच नव्हता … तुला वाटंत होतं अस… मनाच्या भांडणामध्ये मी थकते … गप्प बसते
पण डोळे तुलाच शोधत राहतात … मन तुलाच साद घालत रहातं … तुझ्या अवतीभवती करणाऱ्या मनाला गप्प बसवण जमत नाही मला …
आणि अगदी अचानक असा काहीतरी घडतं ज्यामुळे मला जाणीव होते परत, तू असल्याची… माझ्या जवळ असल्याची… माझ्या मनात असल्याची … तू कुठेच गेलेला नसतोस … माझ्या जवळच असतोस … माझ्या मनामध्ये … मलाच उगाच वाटत तू निघून गेला आहेस म्हणून … पण तू या वेडाबाईला सोडून गेलेलाच नसतोस… तू इथेच असतोस… माझं मन व्यापून उरणारा माझा सखा सावळा … माझा शाम मुरारी … हि जाणीव नाहीशी व्हावीशी वाटते आता … तुझ्यामध्ये हरवुन जावसं वाटतं … या जाणीव नेणीवाच्या पलीकडे … जिथे फक्त तु आणि तुच असशील …

राधा बावरी....आपल्या मनाशी चाललेला आपला संवाद...! खुपच सुखद असतो...पण शब्दात मांडायला ताकद लागते...पण तुम्ही छान व्यक्त केल आहे....
ReplyDeleteआभारी आहे मनोज वैद्य, फक्त राधेपेक्षा हे मनोगत मीरेच्या जवळच आहे असं वाटतं मला.
Deleteहो ...बरोबर आहे...मीरेची मनाची तगमग आहे
Delete