Tuesday, 12 August 2014

whats app ची गरज खरचं किती ?

मध्ये काही दिवसांसाठी मी  whats app बंद केलं , म्हणजे अक्षरशा delete केलं. कारणं माझी होती . एका अर्थी आपण स्वताच स्वास्थ्य गमावत आहोत असा वाटत होतं . एकीकडे मला माझ्यासाठी वेळ हवा म्हणता म्हणता तोच वेळ या whats app वरती वाया जात होता . मित्र- मैत्रिणींशी गप्पा मारणं म्हणजे वाया जाणं ? असा प्रश्न बहुतेकांना पडेल . माझ्यासाठी नक्कीच . कारण मला असा वाटत कि आपण सतत मेसेज करून बोलण्यासारख काही नसतं. कारण बरेचदा विषय उगाचच लांबत जातात. तसंच, रोजच्या रोज सगळ्यांशी मेसेज वरती बोलण्यापेक्षा कधीतरी बोलणं कधीही भरपूर आनंद देतं. हे म्हणजे टेलिफोन चा शोध लागल्यावर लोकांनी एकमेकांना पत्र लिहायचं बंद केल्यासारख आहे . म्हणजे whats app आल्यावर जे बोलायला हवं ते मेसेज मधूनच बोललं जातं , मग त्या मेसेज चा अर्थ प्रत्येकजण काहीही काढू दे . का झालं असाव असं?
माझा तर्क असा आहे कि मेसेज पाठवताना ना आपल्या भावना समोरच्याला कळतात ना समोरच्याच्या आपल्याला . आणि यामुळे बरेचदा गैरसमज होतात . माझ्यासाठी खरा मुद्दा हा नाहीच आहे. कुठतरी असं वाटलं कि यामुळे अति तेथे माती होतं चाललं आहे . माझे नातेवाईक किंवा मित्र -मैत्रिणी यांच्याशी बोलल्यामुळ जो आनंद मिळायचा तो या whats app सारखे applications काढून घेत आहेत. काही दिवसांनी कळलेल्या बातम्यांमुळे  वाटणारं आश्चर्य राहिलाच नाही आहे . मान्य आहे कि याचे काही फायदे पण आहेत पण फायद्यांपेक्षा तोटेच जास्त दिसत आहेत .
ग्रुप वरती पाठवले जाणारे मेसेज हे माहिती देण्यापेक्षा , आपल्याला आला आहे ना? मग पाठवा या भावनेतूनच जास्त पाठवले जातात . येणारी माहिती , खरी आहे का खोटी आहे याचा विचार न करता पाठवली जाते . त्यातूनच अफवा पण पसरवल्या जातात . बरं , आपण ज्या ग्रुप वर असतो त्यातलेच काहीजण आपल्याबरोबरच अजूनही काही ग्रुप वर असतात . त्यामुळे एकाच पोस्ट सगळीकडे पाठवली जाते . बरेचदा असा होतं कि ग्रुप मध्ये असणाऱ्या सगळ्यांची बौद्धिक कुवत सारखी असतेच असं नाही , मग त्यातून समाज-गैरसमजाच एक वेगळचं नाटक रंगतं. काहीजणांसाठी हे असे ग्रुप त्यांचा व्यर्थ अभिमान कुरवाळणारे असतात, तर काहीजणांसाठी नुसता वेळ घालवण्याचे साधन . यामध्ये आपण आपला किती मौलिक वेळ वाया घालवत असतो याच भान कुणालाच नसतं. हाच वेळ काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यात पण वापरता येतो.
या सगळ्यामुळे येणारा ताण हा टाळण्यासारखा नसतो . आणि जिथे आपण आपल्या जवळच्या लोकांशी चार जिव्हाळ्याच्या गप्पा मारायच्या तिथे अजूनच तणावग्रस्त होत जातो .
 मनाला जास्त जाणवत राहिलं कि आपलं बोलणं संपत चाललं आहे , आणि फक्त मेसेजेस ची देवघेव उरली आहे . हे सगळ वेळेत टाळण्यासाठी मी हे app पूर्णपणे बंद केलं होतं. साधारण एक आठवडा. पण तो एक आठवडा खूप सुखाचा ठरला . एक तर सारखं काय मेसेज आले आहेत हे बघायची माझी सवय मोडली , आणि मी online नाहीये याची बहुतेकांना सवय झाली .
एका आठवड्याने हे app मी परत सुरु केलं , याला कारण यावरून पाठवता येणारे फोटो आणि जे बाहेरच्या देशात माझे मित्र - मैत्रिणी आहेत त्यांच्या संपर्कात राहता यावं म्हणून .जे इथे आहेत , भारतात त्यांना अधून मधून फोन करायचं मात्र नक्की केलं आहे , आणि करते पण आहे. त्यांचे कि मन तृप्त होतं , जे १०० मेसेजेस पाठवून पण होत नाही. पण ग्रुप नको . कारण अति जेवल कि अजीर्ण होतं , तसा काहीसं झालं आहे. त्यामुळे माझं वापरणं अगदी कमी झालं आहे. 

1 comment:

  1. देशात प्रत्येक गोष्ट use पेक्षा misuse खुप होते....तेच waps बद्दल झाले...कुठलाही सण...विशेष दिन आला की अंगावर काटायेतो...images delete करायला एखादा माणूस ठेवावा लागेल अस वाटतेअॉगस्ट निमित्तानं मी status ठेवलय.१५.अॉगस्ट निमित्ताने मला देशभक्तीचे मेसेज पाठवून तुमच्या देशभक्तीचे प्रदर्शन माझ्याकडे करु नये....पण माध्यम छान आहे....पण वापरणारे ...पण ही theory सगळीकडे लागू आहे...

    ReplyDelete