माझ्या लहानपणाच्या ज्या काही गोष्टी मला आवडतात त्या मध्ये "दिवाळी" हा सण जास्त आवडतो.
कोल्हापूरच्या दिवाळीची मजा काही औरच होती. शाळेच्या सहामाहीच्या परीक्षा झाल्या रे झाल्या कि दिवाळी चे वेध लागायचे. कधी एकदा दिवाळी येते असा होवून जयच. याच मुख्य कारण म्हणजे दिवाळी ला वाजवायला मिळणारे फटके, नवीन कपडे आणि फराळ .
आईबरोबर महाद्वार रोड ला भटकून ड्रेस खरेदी व्हायची. मग घरही साफ सफाई आणि फराळाची तयारी. आईच्या नोकरीमुळे फराळाचा गोंधळ जास्त नसायचा. फक्त शंकरपाळी आणि चिवडा घरी व्हायचा, कधीतरी चकली पण , बाकीचं सगळं विकत आणलं जायचं. मी जशी ९-१० वीत गेले तसं शंकरपाळी मीच करायला लागले . आई घरात नसताना अशी लुडबुड करायला मज्जा यायची . तसे बरेच प्रयोग केले आहेत मी. कधी म्हैसूरपाक तर कधी जिलेबी , पावभाजी, मिसळ आणि वेगवेगळ्या भाज्या तर नेहमीचं केल्या जायच्या. असो, विषयांतर नको .
बाबा आणि केदार फटके घेवून यायचे , पण अगदी १-२ दिवस आधी. आकाशकंदील आणायचं खातं पण त्यांच्याकडेच होतं. त्यावेळी फार फ़शनबल आकाशकंदील मिळत नसत आणि वापरले पण जात नसत. आमचा आकाशकंदील ठरलेला असायचा , तो म्हणजे चांदणी.
जसजशी दिवाळी जवळ यायची तसतशी माझी excitement वाढत जायची. एकदम उत्साही वगैरे वाटायला लागायचं . या सगळ्यामध्ये रांगोळीची आणि पणतीची खरेदी हा पण महत्वाचा मुद्दा असायचा, अर्थात माझ्यापुरता. वेगवेगळे रंग आधीच आणून ठेवणे, पेपर वर उदबत्तीने भोकं पडून ठिपक्यांच्या रांगोळी ची तयारी करणे, रांगोळीची नवीन पुस्तकं आणून , रांगोळी काढायची प्रक्टिस करणे वगैरे सगळं सुरु असायचं. अशातच कॉलेज ला असताना संस्कारभारतीची रांगोळी शिकले , मग काय? दरवर्षी तीच रांगोळी काढायचे.
नरक चतुर्दशीचा आदला दिवस म्हणजे 'धनत्रयोदशी'. हि म्हणे बायाकांची दिवाळी असते, पण मला असले फरक कधीच मान्य न्हवते. त्यामुळे माझी दिवाळी माझ्या भावाबरोबर नरक चतुर्दशीलाच असायची .
बघता बघता नरक चतुर्दशीचा दिवस यायचा , उजाडायचा नाही कारण उजाडायच्या आतचं आई मला उठवायची , ते पण भल्या पहाटे ४ वाजता. थंडी असायची पण दिवाळी सुश्रु झाली या नादात ती बोचायाची नाही. पटकन चहा घेवून मी दारासमोरचा बोळ झाडून घ्यायचे. मग सडा घालायचा. आणि जिथे जिथे पाणी साचून राहिलं आहे तेवढंच फडक्याने टिपून घ्यायचे . रांगोळी काढायची माझी तयारी व्हायची. हळू हळू आजूबाजूच्या घरातून पण सगळ्या यायला सुरवात झाली असायची . रांगोळी काढताना पण एका झटक्यात जर ती झाली तर रांगोळी कसली? आधी ठिपक्यांची ठरलेली रांगोळी काढायची, ते ठिपके जोडताना कुठेतरी चुकायचं , माग ती पुसायची , दुसरी काढायची . कधी कधी वैतागून मी फ्री हान्ड काढून रिकामी व्हायचे. असा करत करत ५. ३० पर्यंत ती तयार व्हायची . मग मी घरात यायचे. बाबा आणि केदार तयार झालेले असायचे. मग अंगाला तेल लावून अभ्यंगस्नान व्हायचं आणि मी तयार व्हायचे. नवीन कपडे घालायची मजा यायची. माझे आणि केदार चे फटाके आधीच वाटलेले असायचे. त्याची पिशवी वेगळी आणि माझी वेगळी असायची. मला सुतळी बॉम्ब वाजवायची भीती वाटायची, त्यामुळे ते सगळे केदार कडे जायचे . माझ्याकडे लवंगी फटका,लक्ष्मी तोटे , झाड , भुइचक्कर, पेन्सिली, दोर्या, नागगोळ्या , काडेपेटी आणि वेगवेगळ्या रंगाच्या आणि साध्या अशा फुलबाज्या असायच्या. यातसुद्धा फटके पुरावेत म्हणून आम्ही लवंगी ची माळ सोडून एक एक फटाकी उडवायचो . बोळातला केदार चा मित्र फटके उडवायची सुरवात करायचा ते पण दरवर्षी ५ वाजता एक सुतळी बॉम्ब लावून.
त्या दिवशीचे फटाके उडवून झाले की, मग आम्ही अंबाबाईला जाउन यायचो. परत आलो कि फराळ खायचा आणि मग परत हुंदडायला मोकळे. आई ला सुट्टी नसायची . मग एक चक्कर मोठ्या काकांकडे व्हायची.
संध्याकाळ झाली कि पणत्या लावायची तयारी करायची. मोठ्या दरवाजाच्या बाहेर दोन पणत्या आणि अंगणातल्या प्रत्येक कुंडीत एक , अशा पणत्या लावायचे मी. अंगणात टांगलेला आकाशकंदील आणि ओळीने तेवत असलेल्या पणात्यांमुळे अंगण एकदम सुरेख दिसायचं.
खरी मजा यायची ती लक्ष्मिपुजनाला. धाकट्या काकाचा फॅब्रीकेशन चा कारखाना होता , राजारामपुरीत. आमच लक्ष्मीपूजन तिथे व्हायचं. पुजेची सगळी तयारी करून सगळे काका-काकु आणि आम्ही सगळी भावंड तिथे पोहोचायचो. तिथे फुलं आणि फटाके आधीच आणून ठेवलेले असायचे . मी आणि माझ्या बहिणी , आम्ही जमीन झाडून घ्यायचो आणि त्यावर पाण्याचा सडा टाकायचो. आमच्यातली मोठी बहिण रांगोळी काढायची आणि आम्ही सगळ्या त्यात रंग भरायचं काम करायचो. कधी एकदा पूजा होते असा होवून जायचं. पूजा झाली रे झाली कि आम्ही लगेच फटाके उडवायला पळायचो . सगळेच बरोबर असल्यामुळे धमाल यायची.
दिवाळीत मी वाट बघायचे ती भाऊबीजेची. कारण त्या दिवशी मी आधीच घेतलेला ड्रेस मिळायचा मला . त्यावेळी वर्षातून दोनदाच मोठी खरेदी व्हायची , एक दिवाळी आणि दुसरा वाढदिवस, दिवाळीमधे दोन ड्रेस घेतले जायचे. अधे मधे कापड खरेदी क्वचित व्हायची.

ते दिवस खरचं खूप खास होते . सगळं लिमिटेड असून पण त्यातून मिळणारा आनंद अनलिमिटेड होता . खूप वाटत ते दिवस परत यावेत . मी जशी दिवाळी अनुभवली तशी माझ्या मुलीला पण अनुभवायला मिळावी.
No comments:
Post a Comment