आषाढ जसंजसा यायला लागतो तसतशी ओढ लागते ती वारीची . मी अजून एकदाही वारी केली नाहीये . पण इच्छा मात्र खूप आहे . वारकर्यांच्या बरोबर जाउन फक्त एकदा तरी वारी करायची आहे. त्यांची भक्ती , त्यांच विठ्ठलाशी समर्पित असणं , एकमेकांना 'माउली' म्हणून पायाला हात लावून नमस्कार करणं , सगळं सगळं अनुभवायचं आहे . त्यांच्या बरोबर रांगेत उभ राहून विठ्ठलाच गोजिरवाणं रूप बघायचं आहे.
आपली संत परंपरा खूप मोठी आहे .सगळे संत पंढरपूरच्या विठ्ठालाच्या पायाशी जमा झाले , त्याच्या भक्तीमध्ये बुडाले.
विठ्ठलाच्या पायाशी लीन होताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ,
रत्नकीळ फांकती प्रभा ।अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥आपली संत परंपरा खूप मोठी आहे .सगळे संत पंढरपूरच्या विठ्ठालाच्या पायाशी जमा झाले , त्याच्या भक्तीमध्ये बुडाले.
विठ्ठलाच्या पायाशी लीन होताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ,
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।तेणें मज लावियला वेधु ।खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।हें तंव कैसेंनि गमे ।परेहि परतें बोलणें खुंटलें ।वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।उभाचि स्वयंभु असे ।समोर कीं पाठिमोरा न कळे ।ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।म्हणवूनि स्फुरताती बाहो ।क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।आसावला जीव राहो ॥५॥
तर तुकाराम महाराज म्हणतात
आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु
हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥आम्हां धातु विठ्ठल मातु विठ्ठलुगातु विठ्ठलु आनंदे ॥२॥
आम्हां राग विठ्ठलु रंग विठ्ठलुसंग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥
आम्हां ताल विठ्ठलु मेल विठ्ठलुकल्लोळ विठ्ठलु कीर्तने ॥४॥
आम्हां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलुमत्ता विठ्ठलु वदनी ॥५॥
आम्हां मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलुएका जनार्दनी अवघा विठ्ठलु ॥६॥
एका लेखामध्ये स्मिता तळवलकर यांनी लिहीलं होतं , कि वारकर्यांचा विठ्ठल नामाचा गजर जेव्हा टिपेला जातो तेव्हा मंदिराचे कळस पण डोलतात . त्या गेल्या होत्या हे खरा आहे का बघायला . नक्की आठवत नाही पुढच मला , पण वातावरण एवढ विठ्ठल नामानं भारलेलं असतं कि ते कळस डोलताना दिसतात असा काहीसं लिहिलं होत त्यांनी .
हे सगळं अनुभवायचं आहे , एकदा तरी वारी ला जायचं आहे .
सुंदर मनोगत.
ReplyDeleteपु.लंनी ऎकेठिकाणी असं म्हटलंय की "मोटारीतून जाऊन पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेणं कधीही शक्य आहे... पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने जेव्हा लाखो वारकरी उरीपोटी धावत पंढरपूरला जातात, भक्तीभावाने एकमेकांना गळामिठी घालतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये होणारं विठ्ठलाचं दर्शन हे निव्वळ अलौकिक आहे".. :-)
खरचं एकदा वारी करायची आहे.