मस्त धुपाचा वास असलेली, हवेत किंचींत थंडावा असलेली 'संध्याकाळ'
शुभंकरोती म्हणणारी, उदबत्तीचा वास असणारी 'संध्याकाळ'
मनाला हुरहुर लावणारी, सुर्याला बुडताना बघणारी 'संध्याकाळ'
कुटुंबा समवेत बाहेर फिरायला येणारी 'संध्याकाळ'
कुटुंबाची हक्काची असणारी 'संध्याकाळ'
उद्याचे plans ठरवणारी 'संध्याकाळ'
मित्रांची मैफल जमवणारी 'संध्याकाळ'
पावसाळ्यात अंधार उगाचच मनात पण दाटुन आणणारी 'संध्याकाळ'
दिवस संपला म्हणुन थकलेलं मन आणि शरीर घरी घेवुन जाणारी 'संध्याकाळ'
प्रवासातली 'संध्याकाळ'
हरीहरन , जगजीतसिंग च्या गझ़़ल ऐकणारी 'संध्याकाळ'
जगाच एकटेपण घेउन येणारी 'संध्याकाळ'
समुद्रावरची मन शांत करणारी 'संध्याकाळ'
अभ्यास करणारी 'संध्याकाळ'
कधी मनाला सावरणारी तर कधी बेभान करणारी 'संध्याकाळ'
कुणाची तरी वाट पहाणारी 'संध्याकाळ'
लसणीच्या फोडणीच्या वासाची 'संध्याकाळ'
रस्त्याकडेला बसलेल्या भाजीवाल्यांच्या ओरडण्यची 'संध्याकाळ'
दिव्यंाची 'संध्याकाळ'
कट्ट्यावर जमणार्या आजोबांची 'संध्याकाळ'
नाक्यावर जमणार्या मित्रांची 'संध्याकाळ'
लोकलच्या खडखडाची, घरी परतणार्या आतुर मनांची 'संध्याकाळ'
मैत्रीणींबरोबर खरेदिचा बेत करणारी 'संध्याकाळ'
त्या दोघांच्या नाज़ुक क्षणांची साक्षीदार 'संध्याकाळ'
त्याला निरोप देताना मन दाटुन आलेली 'संध्याकाळ'
No comments:
Post a Comment