आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणाच्या काही आठवणी कधीच विसरल्या जात नाही. खूप आनंदाच्या किंवा खूप दुःखाच्या आठवणी लक्षात असतात असा काही नाही . पण मनात कोरल्या गेलेल्या असतात . त्यातल्याच काही म्हणजे आजारी असतानाच्या किंवा खूप लागला वगैरे असतानाच्या आठवणी . या आठवणी लक्षात राहाण्याच मुख्य कारण म्हणजे त्यावेळी झालेले खूपसारे लाड . एरवी कोण करत हो असे लाड? धम्मक लाडु आणि चापट पोळी खाण्याचे दिवस ते . तर असो , एवढ पाल्हाळ पुरे झालं.
लहानपणी खुप धडपडी होते मी . त्यामुळं सततं पडणं आणि लागणं तर ठरलेलं असायचं. त्याचीच आठवण येतेय आत्ता . साधारण ३-४ वर्षाची असताना मी आणि केदार (माझा भाऊ ) आम्ही फुग्याने खेळत होतो . ते नाही का मोठे फुगे येतात ?? गोल , सफरचंदासारखे ? त्या तशा फुग्याने खेळत होतो आम्ही , ते पण कॉट वरती, उभेराहुन. आपण बॅडमिंटन खेळतो ना तसे . संध्याकाळची वेळ होती . त्याचवेळी आज्जी (आईची आई) आल्यामुळे आई तिथेच उभी राहून तिच्याशी गप्पा मारत होती. आणि त्याचेवेळी एकदम लाईट गेली . त्याचवेळी केदार ने फुगा माझ्या बाजूला मारला तो तिरका गेला. आणि मी खेळायच्या नादात त्या फुग्याला मारायला गेले आणि कॉट संपला आहे हे लक्षातच आलं नाही. दाणकन हातावर पडले . मला काय झालं ते कळलचं नाही . खूप रडले होते एवढंच आठवतंय. रात्रभर हात खूप दुखत होता आणि ने शेकला , बाम वगैरे लावला. या सगळ्या गोंधळात बाबा नव्हते , ते सकाळी आले . आल्या आल्या त्यांना झालेला गोंधळ कळला आणि मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो . हाताला प्लास्टर घातलं आणि ते जवळ जवळ १५ दिवस तसंच होतं . पण त्या काळात जी काय बडदास्त होती , अहाहा , ती काय विचारावी .
आईच्या नोकरीमुळे आजी -आजोबा जो पर्यंत होते तो पर्यंत दिवसभर आम्ही त्यांच्याकडे असायचो . त्यांचा वाडा होता . आणि वाड्यात २-३ बिर्हाड होती . आम्ही सगळे मिळून ५-६ जण असायचो . धमाल यायची खेळायला . खूप मस्ती सुरु असायची . असाच एकदा खेळत असताना, केदार जोरात पडला आणि त्याच्या गुडघ्याला लागलं. खूप जोरात आपटल्यामुळ लागलं पण तसचं होतं . आता जर आजी-आजोबांना कळलं तर आपली काही खैर नाही असा वाटून रडूच यायला लागलं . मी ४ वर्षांची आणि केदार ६ वर्षाचा असेल . त्याला ३ चाकी सायकल घेतलेली होती , डब्बल सीट . माझ्या डोक्यात काय आल कुणास ठाऊक , मी म्हटलं आपण डॉक्टर काकांकडे जाऊ (आमचे फमिली डॉक्टर होते , डॉक्टर माळी म्हणून ), तू मागे बैस आणि मी सायकल चालवते. तो पण तयार झाला . त्याला मागे बसवून मी त्याला डॉक्टर काकांच्याकडे घेवून गेले , साधारण ३-४ कि. मी . अंतर असेल . तिथे पोहोचल्यावर मी खाली थांबले (दवाखाना पहिल्या मजल्यावर होता ) , कारण सायकल कुणीतरी घेवून जाइल अशी भीती वाटत होती . त्याला एकट्याला आलेलं बघून डॉक्टर काकांना खूप आश्चर्य वाटलं . त्यांनी सगळी चौकशी केली . आम्ही दोघेच त्या सायकल वरून आलो आहे यावर आधी त्यांचा विश्वासच नाही बसला. ते लगेच खाली उतरून आले. मला सायकल पाशी बघून त्यांचा विश्वास बसला . मला नि सायकलीला ते वरती घेवून गेले . केदार च ड्रेसिंग झालं , डॉक्टर काकुंनी काहीतरी खाऊ दिला खायला . आणि काका त्यांच्या स्कूटर वरून आम्हाला सोडायला आले . आता आश्चर्य करायची पाळी आजोबांची होती . डॉक्टर काकांनी जे झालं होतं ते सगळं सांगितलं . ओरडण तर सोडाच , आजोबाना खूप कौतुक वाटलं होतं , त्यामुळ संध्याकाळी आईपुढ खूप कौतुक झालं आणि आईस्क्रीम पण मिळालं .

:-) गोड आठवण..सुंदर लेख
ReplyDelete