मी महिन्याच्या सुट्टीत बेळगावला काकाकडे जाण्याचा आमचा शिरस्ता होता. आम्ही सगळी मिळुन ८-१० भावंड असायचो. सगळे मिळुन धमाल करत असुं. पण खरी मजा यायची ती रात्रीच्या वेळी वीज गेल्यावर. त्यावेळी रॉकेल चे दिवे वापरले जायचे. ते पण घरी केलेले. औषधाच्या बाटलीत रॉकेल भरायचं, त्याच्या झाकणाला भोक पडायचं, त्यात कापडाची चिंधी घालायची वात म्हणून, झाला दिवा तयार.
तर असा हा दिवा मध्यभागी तेह्वून आम्ही सगळे कोंडाळं करून बसलेलो असयचो. गप्पा सुरु असायच्या आणि मधेच माझ्या भावाला हुक्की यायची , ती भुताच्या गोष्टी सांगायची. माझा भाऊ प्रचंड खोडकर होता आणि गप्पिष्ट पण. त्याची आवडती गोष्ट होती एक, बरेचदा तीच सांगायचा, चांगला घोळवून घोळवून सांगायचा.
तर गोष्ट अशी होती , एका गावाबाहेर एक घर होतं. त्या घरात आई आणि मुलगी, दोघीच राहायच्या . त्या घराला मागे एक अंगण होतं, आणि अंगणात एक वडाच झाड होतं. त्या मुलीच्या आईने , मुलीला सांगितलं होता कि अंगणात कधीही जायचं नाही. ती मुलगी पण आईच ऐकायची . पण तिला उत्सुकता खूप होती.
एकदा काय झालं? आईला जायचं होत बाजारात म्हणून ती मुलीला म्हणाली , "मी बाजारात जाउन येते . पण तू अंगणात मात्र जाऊ नको . आणि दार खिडक्या नीट लावून घे." मुलीला मनातून खूप आनंद झाला. ती होहो म्हणाली . जशी आई बाहेर पडली तशी हि अंगणात गेली . बघते तो काय , त्या वडाच्या झाडावर एक बाई बसलेली होती, ती तिच्याकडे बघत तिला ये,ये म्हणत होती (इथ त्याचा आवाज एकदम खर्जातला होवून जायचा , आणि आमच्या मध्ये भीती शिरायला लागलेली असायची ). तिला खूप भीती वाटली . ती पळत घरी आली आणि सगळी दारं घट्ट लावून घेवून बसली.
एवढ्यात पुढच्या दारावर टकटक झाली (इथ आमच्या कपाळावर घाम यायला सुरवात ). त्या मुलीने घाबरतच विचरला, "क…. क… कोण आहे?" "अगं मी आहे, आई तुझी, दार उघड". हुश्श म्हणत दरवाजा उघडला तिने . आईच होती समोर (इथे आम्ही पण लगेच हुश्श… ) . तेवढ्यात तीच लक्ष आईच्या पायाकडे गेलं , बघते तो काय! आईचे पाय उलटे (आम्ही जबरदस्त घाबरलेलो ). "आई , आई , पाय कसे गं उलटे झाले तुझे ? ". आई हसून म्हणाली ' अगं , मी बाजारात जायला निघाले होते नं , तेवढ्यात वादळ आलं. मी वळले घराकडं पण पाय मात्र बाजाराकडेच निघाले, म्हणून उलटे झाले गं ". (भीती आता पोटात शिरलेली असायची). "आई , आई, तू नाही म्हणतेस , पण मी आज मागच्या अंगणात गेले होते. तिथे वडाच्या झाडावर एक बाई बसलेली बघितली. पांढरी शुभ्र साडी , पांढरे केस, लाल लाल ओठ, कपाळावर भलं मोठा कुंकू, उलटे पाय. आणि आई ती मला हात लांब करून बोलावत होती . कोण आहे ग ती ?". इथे आमचा आवंढा गळ्यात अडकलेला असायचा. माझा भाऊ एक क्षण थांबायचा आणि झटक्यात हाताचे पंजे पसरून , डोळे मोठे करत आमच्या अंगावर येत "मीच ती" म्हणून असा ओरडायचा कि आम्ही समोर बसलेले सगळे किंचाळायला लागायचो. आणि हा मात्र फिदीफिदी हसत बसायचा.
आणि मगं जे गोष्टींच पेव फुटायचं , अक्षरश: चढाओढीने गोष्टी सांगितल्या जायच्या. गोष्टी सांगताना आवेशात आलेले आम्ही सगळेजण झोपताना मात्र मध्ये झोपायचो.

हे हे.. मे महिन्याच्या सुट्ट्या अजरामर आहेत. ...
ReplyDelete