लहानपणीची अजून एक आठवण म्हणजे माझा झालेला अक्सिडेंट. दचकु नका असे , फार मोठा नाही , छोट्टासा . खूप धडपडी असल्याने असे छोटे मोठे प्रसंग बरेचदा आलेत. तर झालं असं कि मी आणि माझी वाड्यात राहणारी मैत्रीण प्रिया (वय वर्षे ६) कशावरून तरी भांडलो होतो आणि म्हणून बोलत नव्हतो , सकाळपासुन. साधारण ४ च्या सुमाराला ढोल आणि फटाक्यांचा आवाज ऐकू आला तशी मी वाड्याच्या बाहेर येवुन दारात उभी राहिले. असेन साधारण ५ वर्षांची . शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम सुरु होता निवृत्ती चौकात (त्याला अर्धा शिवाजी पुतळा पण म्हणतात , कारण तिथे बसवलेला महाराजांचा पुतळा अर्धा आहे ), म्हणजे घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर. तोच आवाज ऐकुन प्रिया पण बाहेर आली. पण बोलायचं नव्हतं ना ? आता काय करायचं ? थोडा वेळ आम्ही दोघी पण एकमेकींकडे न बघता कार्यक्रम सुरु होता तिकडे बघत होतो . फटक्यांमध्ये मधेच एक बॉम्ब फुटला आणि आम्ही दोघी पण दचकलो . दोघींना पण कळलं कि आपण दचकलो , मग जी हसायला सुरवात झाली त्यात सकाळचा अबोला कुठल्याकुठे गेला . दोघींनी पण ढोल वाजवत होते तिथे जायचं ठरवलं. तिकडे जायचं तर समोरचा रस्ता ओलांडावा लागला असता. म्हणून मग आम्ही एकमेकींचे हात धरले आणि निघालो , जवळ जवळ पळतच . आणि तेवढ्यात एक ब्रेक चा करकचून आवाज आला आणि काही कळायच्या आत मी आणि प्रिया रस्त्यावर पडलो . आजूबाजूचे लोक गोळा झाले .आम्ही खूप घाबरलो होतो . त्यामुळं धड उठता पण येत नव्हतं . वाड्या समोर असणाऱ्या दुकानदारांनी आम्हा दोघींना उचललं आणि घरी नेलं . घरी नशिबान कुणी ओरडलं नाही . तसंपण फारसं लागल नव्हतंच . पण लाड मात्र खूप झाले . प्रियाच्या आईने आम्हाला गरम गरम तूप मेतकुट भात खायला घातला होता . अर्थात . त्यात पण माझ आणि प्रियाच सुरु होतंच , कुणाला जास्त लागल आहे यावरून . दोघींना पण वाटत होता कि आपल्याला जास्त लागल आहे .
त्यावेळी भीती हा प्रकारच माहिती नव्हता . आमचा वाडा म्हणजे मध्ये अंगण आणि दोन्हीबाजूला खोल्या . तसाच समोरच्या ज्या दोन बाजूच्या खोल्या होत्या त्यावर आजीचा शिवण क्लास ची खोली होती . त्याच्या बाजूला अजून एक खोली आणि तिला काटकोनात अजून एक खोली होती , ती स्वंयपाकघराच्या वरती होती . आजीच्या स्वयंपाक घराच्या मागे न्हाणी होती आणि त्याच्यामागे परत अंगण होतं . त्या अंगणापलीकडे अजून दोन खोल्या , आणि समोर दोन खोल्या . मला खोड होती , आजोबा झोपले आहेत असा बघून मी अंगणात ठेवलेल्या दगडांच्या राशीवरून , न्हाणीच्या पत्र्यावर चढायचे आणि तेथून वर स्वयंपाक खोलीच्या वरच्या खोलीच्या पत्र्यावर . तो पत्रा दोन बाजुनी उतरता होता. त्याच्या टोकावर जाऊन , डोक बाहेर काढून , रस्त्यावरून येणारी जाणारी वाहनं बघत बसणं मला आवडायचं . मला तशी बघून समोरच्या तरुण मंडळाची मुलं , आजोबांकडे सांगायला यायची . आजोबा चिडून यायचे , ओरडून मला खाली उतरायला लावायचे . मी उतरायचे आणि धूम ठोकायचे . परत दुसर्या दिवशी तोच उद्योग.
फक्त एकदा हे सगळ परत अनुभवायचं आहे . आता सगळंच स्वप्नवत वाटतं .

कोल्हापुरातले गल्ली बोळ डोळ्यासमोर येतायत... जुनाट घर आठवतात... तिथे जाऊन watercolurs करत बसावस वाटतय. :)
ReplyDeleteMast athwan.. :-)
ReplyDeleteतुम्ही म्हणजे मस्ती की पाठशाला ...मनोज वैद्य -बदलापूर
ReplyDelete